Onion Harvesting
Onion HarvestingAgrowon

Onion Market : कांद्याला मिळेना उत्पादन खर्चाएवढाही भाव

Onion Harvesting : कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे .
Published on

Pune News : आळेफाटा परिसरात पहिल्या टप्प्यात लागवडी झालेला कांद्याची काढणीला सुरुवात झालेली दिसुन येत आहे. साधारणपणे संप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात लावलेला कांद्या काढणीला असुन आळेफाटा परिसरातील आळे,राजुरी,वडगाव आनंद,बोरी बुद्रूक,बोरी खुर्द,कोळवाडी ,संतवाडी ,उंचखडक,वडगाव कांदळी या गावांमधील शेतकरी सध्या कांदा काढताना दिसुन येत आहे.

कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजार भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे .सध्या कांद्याला ५ते १२ रुपये प्रति किलो दर मिळत असून यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. इंधनाचे भरमसाठ वाढलेले दर , मजुरी ,मशागत या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Onion Harvesting
Soybean, Onion Market : सरकारने शेतकऱ्यांचा `करेक्ट कर्यक्रम` कसा केला? सरकारच्या कोणत्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली?

रासायनिक खते तसेच औषधाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजार भाव हा अतिशय कमी असून यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. चालु वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती.

Onion Harvesting
Onion Market: निवडणुकांपर्यंत कांदा स्वस्तच राहणार का? कांद्यासाठी शेजारच्या देशांची मागणी असतानाही सरकार निर्यातबंदीवर ठाम

वातावरणात होणा-या सततच्या बदलामुळे या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असुन यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट आली असुन कांदा जास्त काळ टिकून राहील की नाही. याबाबत शेतकऱ्यांना साशंकता आहे.

तसेच एका किलोला साधारणपणे १२ ते १४ रूपये खर्च येत आहे व सध्या मिळत असलेला भाव अतीशय कमी मिळत असल्याने शासनाने हमी भावाने कांदा खरेदी करावा अशी परिसरातील शेतकर्‍यांची मागणी आहे.

मजुराअभावी शेतकरी मेटाकुटीला

कांदा काढणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता या वर्षी पहावयाला मिळत आहे. कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये असणारी मजुरी ५०० रुपयांपर्यंत गेली असल्याने शेतक-यांना एकरी १५ ते २० हजार रुपये कांदा काढणीचा खर्च येत असुन मजुरांना मजुरी बरोबरच प्रवास खर्च द्यावा लागत असल्याने खर्चात वाढ झाली.

गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे त्यातच शासनाने कांद्याची निर्यात बंद केल्याने बाजारभाव अतिशय कमी असुन झालेला खर्च सुध्दा फिटत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे शासनाने उत्पादन खर्चावर हमीभाव देऊन कांदा खरेदी करावा व कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
- कांदा उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com