
Nashik News : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.याची धग पाहायला मिळत असून, बुधवारी (ता.१२) नामपूर (ता. बागलाण) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २० टक्के कांदा निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली. अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण रब्बी हंगामाच्या तोंडी अडचणीत आहे. यंदा शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कांदा लागवड केली आहे. सुरुवातीला मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी पूर्ण केल्या आहेत. मजूरटंचाईमुळे शेतकऱ्यांनी वाट्या मजुरीच्या समस्येला तोंड देऊन लागवड केली. आता कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लागू केलेली २० टक्के निर्यात शुल्क दरवाढीसाठी अडचणीचे ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ते माफ करण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत रोष व्यक्त केला. सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे आंदोलन स्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
या वेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शैलेंद्र कापडणीस, शेतकरी संघटनेचे नामपूर शहराध्यक्ष राजीव सावंत, रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज देवरे, शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोर, नितीन भामरे, सचिन कापडणीस, समाधान देवरे, दिनेश कापडणीस, राहुल कापडणीस, केदा कापडणीस उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.