Onion Market : विंचूर उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव सुरळीत

Onion Procurement : केंद्र सरकारने कांदा दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने कांदा दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले. परिणामी, निर्यात कामकाज अडचणीत सापडले. त्यामुळे नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून मागण्या मान्य न होईपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

परिणामी, जिल्ह्यातील १७ बाजार समित्या व त्यांच्या उपबाजार आवारात लिलाव ठप्प आहेत. मात्र लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव गुरुवार (ता. २८)पासून सुरू झाले आहेत. त्यानंतर शुक्रवारी (ता. २९) कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले.

Onion Market
Onion Market : कांदा लिलाव बंदमुळे १५० कोटींवर उलाढाल ठप्प

कांद्याची आवक १६ हजार २९० क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल २३५१, तर सरासरी २१५० रुपये दर मिळाले. गेल्या पाच महिन्यांत कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळाले. त्यांनतर ऑगस्ट महिन्यात आवक कमी होऊन पुरवठा घटल्याने दरात सुधारणा दिसून आली.

अशातच केंद्र सरकारने हस्तक्षेप करत निर्यातशुल्क वाढीचा निर्णय लादला. परिणामी, व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली.

Onion Market
Onion Market : केंद्र सरकार कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेणार? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र फायदा नाही

अखेर लासलगाव बाजार समिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी कांदा व्यापाऱ्यांना आवाहन करत विंचूर उपबाजारात कांदा लिलाव सुरू करण्याबाबत आवाहन केले. एकीकडे कांद्याची सड होत आहे तर दुसरीकडे राज्य व केंद्र सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.

परिणामी, ही बाब शेतकरी व व्यापारी यांना परवडणारी नसल्याने कांद्याचे सुरू घेण्याबाबत बैठक झाली. त्यानुसार हे लिलाव गुरुवार (ता. २८)पासून सुरू झाले आहेत. अवकेत वाढ दिसून आली, तर दरात किंचित सुधारणा आहे.

३०० कोटींवर उलाढाल ठप्प

गणेश चतुर्थीच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्याने जिल्ह्यात कांदा लिलाव झालेले नाही मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा व्यापारी असोसिएशनने कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी ठप्प झाली होती.

परिणामी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची मोठी कोंडी झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. गेल्या ११ दिवसांत कांद्याचे लिलाव न झाल्याने जवळपास १७ लाख क्विंटल कांद्याची आवक तुंबली आहे तर सुमारे ३०० कोटींवर उलाढाल ठप्प झाल्याने कांदा पिकाचे अर्थकारण अडचणीत सापडले आहे.

दोन दिवसांतील कांद्याची आवक

तारीख आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी

२८ सप्टेंबर ६५०० १००० २४०१ २१७५

२९ सप्टेंबर १६२९० ७०० २३५१ २१५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com