Turmeric Market: नांदेडमध्ये नव्या हळदीला मिळाला १४ हजार रुपये प्रति क्विंटल दर!

Turmeric Price: नांदेडच्या नवा मोंढा बाजारात नव्या हळदीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मात्र, यंदा हळदीच्या उत्पादनात घट असून, तूर, हरभरा आणि सोयाबीनचे दर मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहेत.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Nanded News: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या नवीन हळदीची आवक सुरू आहे. या हळदीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (ता. ३०) चार हजार ३६५ क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी १३ हजार ९९० रुपये दर प्रति क्विंटल मिळाला. परंतु हरभरा, तूर आणि सोयाबीन मात्र हमी दरापेक्षा कमी किमतीने विकले जात आहेत.

नांदेड जिल्ह्यात सध्या हळद काढणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मार्च महिन्यात सुरू झालेले हळद काढणीचे काम एप्रिलअखेर चालण्याची शक्यता आहे. सध्या तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे. यामुळे उष्णतेचा सामना हळद काढणाऱ्या कामगारांना करावा लागत आहे.

Turmeric
Turmeric Price: हळद दरात सुधारणांचा ट्रेंड

अशावेळी सकाळी सात वाजता हळद काढणीचे काम करावे लागत आहे. यंदा हळदीच्या उत्पादनात घट येत असल्याचे चित्र आहे. हळद काढणीनंतर ती शिजवून वाळविली जाते. या हळदीला पॉलिश करून ती विक्रीसाठी शेतकरी बाजारात सध्या आणत आहेत. नांदेड बाजारात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. दरम्यान रविवारी (ता. ३०) गुढीपाडवा असल्यामुळे या मुहूर्तावर हळदीची आवक चार हजार ३६५ क्विंटल झाली.

Turmeric
Turmeric Market: अवघ्या दीड महिन्यात हळदीच्या दरात ३ हजारांची घसरण

या हळदीला किमान ११ हजार २९०, कमाल १४ हजार ९११ रुपये तर सरासरी १३ हजार ९९० रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. हा दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत चार ते पाच हजारांनी कमी आहेत. दुसरीकडे बाजारात मात्र तूर, हरभरा व सोयाबीन किमान हमी दराच्या खाली विक्री होत आहे. या धान्यांची चांगली आवक असल्याचे सचिव एम. पी. बारसे यांनी सांगितले.

रविवारी (ता. ३०) बाजारात झालेली आवक व दर

(आवक क्विंटलमध्ये/दर रुपयांत)

शेतीमाला आवक कमाल दर किमान दर सरासरी दर

हळद ४३६५ १४,९११ ११,२९० १३,९९०

सोयाबीन ८१८ ४,३५१ ४,१११ ४,३०१

गहू ३६४ ३,०२१ २,४०० २,८७५

ज्वारी ७२ २,७११ २,००१ २,४१०

हरभरा ६४५ ५,५६१ ५,२४० ५,४९५

तूर २१२ ७,००१ ६,४६१ ६,९८१

मूग ०७ ५,८०० ५,८०० ५,८००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com