

Amravati News : आवक कमी असल्याने मुगाच्या दरात चांगली तेजी आली आहे. सध्या बाजारात दररोज सरासरी दोन ते तीन पोत्यांचीच आवक होत असून याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. मुगाचा हमीभाव ८५५८ रुपये असताना बाजारात कमाल ११ हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
दर्यापूर तालुक्यात मुगाची लागवड सर्वाधिक होते. त्यामुळे त्याच भागातील बाजार समितीमध्ये या मुगाची विक्री होत असल्याने जिल्ह्याच्या इतर बाजार समितींमध्ये पुरेशी आवक राहत नाही, असा दरवर्षीचा अनुभव आहे. या खरीप हंगामात जिल्ह्यात जेमतेम १०६४ हेक्टर क्षेत्र असताना येथील बाजार समितीत मुगाला १४ हजार रुपये, असा उच्चांकी दर खरेदीदारांनी जाहीर केला आहे. मात्र अजून बाजारात अपेक्षित आवक नाही.
दरम्यान, यावर्षी मुगाच्या उत्पादनाची सरासरी ३३ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे. पोळा सणाच्या आसपास हाती येत असलेल्या नवीन मुगाचे बाजारात गेल्या सप्ताहात आगमन झाले. मुहूर्ताला मंगळवारी (ता. ५) अवघ्या पाच पोत्यांची आवक झाली, त्या वेळी हमीदरापेक्षा कमी भाव होता. आता आवक दोन ते तीन पोत्यांची असताना खरेदीदारांनी हमीदरापेक्षाही अधिक दर काढले आहेत.
मुगाला सध्या खुल्या बाजारात उच्चांकी ११ हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव आहे. मंगळवारी (ता. ५) येथील बाजार समितीत पाच पोत्यांची आवक झाली. त्या वेळी खरेदीदारांनी ६,७०० ते ७,४०० रुपये भाव दिला. त्यानंतर आठ सप्टेंबरला तीन पोत्यांची आवक झाली, त्या वेळी हे दर सुधारून १२५०० ते १४०११ वर गेले. केंद्राने या हंगामात मुगाला ८,५५८ रुपये आधारभूत दर जाहीर केला आहे.
मुगाचे पेरणीक्षेत्र दरवर्षी कमी होत आहे. जिल्ह्यात एकूण १५ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र मुगाखाली आहे. गतवर्षी (२०२२-२३) ७७३९ हेक्टरमध्ये पेरणी होती. मात्र उत्पादनाची सरासरी हेक्टरी २५ किलो आली. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील मुगाची उत्पादकता सर्वाधिक ३२६५ किलो होती. त्यानंतर मात्र सरासरी घटतच गेल्याने पेरणीक्षेत्र झपाट्याने कमी होत जाऊन यावर्षी १०६४ हेक्टरमध्येच पेरणी झाली.
३०८ किलो हेक्टरी उत्पादन येईल, असा कृषी विभागाचा अंदाज असला तरी तो चुकू लागला आहे. पेरणीक्षेत्र व उत्पादनाची घसरलेली सरासरी यामुळे बाजारात मुगाची टंचाई राहणार आहे. राज्यात यावर्षी मुगाची उत्पादकता ३३ टक्के घसरण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे. बाजारात आवक नसल्याने भावाच सुधारणा झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.