Nashik Vegetable Market : हिरवी मिरचीच्या दरात नाशिकमध्ये सुधारणा

Green Chili Rate : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ मे ते २० जूनदरम्यान हिरवी मिरचीची आवक १,९२० क्विंटल झाली.
Green Chili
Green ChiliAgrowon
Published on
Updated on

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ मे ते २० जूनदरम्यान हिरवी मिरचीची आवक १,९२० क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४,००० ते ५,००० रुपये  तर सरासरी दर ४,५०० रुपये मिळाला. त्या मागील सप्ताहात आवक ८१३ क्विंटल होती. सरासरी दर ३,७०० रुपये मिळाला होते. तर आता आवकेत वाढ होऊन क्विंटलमागे ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढउतार होत असल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक २,८१८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५,००० ते ६,००० असा तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला. तर घेवड्याला प्रतिक्विंटल ७,००० तर १०,००० तर सरासरी ९,००० असे राहिले.

Green Chili
Fruit Vegetable Scheme: फळझाडे, भाजीपाला योजना

उन्हाळ कांद्याची आवक २१,०६४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५० ते २,००१ तर सरासरी दर १,३०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,७२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,२०० ते १,९०० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला. लसणाची आवक ९३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३,५०० ते १०,२०० तर सरासरी दर ६,५०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते ३५० तर  सरासरी २०० रुपये, वांगी ३०० ते ६०० तर सरासरी ५००, फ्लॉवर १५० ते ३५० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १०० ते १८० तर सरासरी १५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. कारले ५०० ते ७२५ तर सरासरी तर सरासरी ६०० रुपये मिळाला.

Green Chili
Vegetable Nursery : सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला रोपांना मागणी रोडावली

ढोबळी मिरचीला ४०० ते ७०० तर सरासरी दर ५५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १५० ते ३५० तर सरासरी २५०, गिलके ५४० ते ८०० तर सरासरी ६००, दोडका ५०० ते १,००० तर सरासरी दर ८०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

फळांमध्ये केळीची आवक १,८५० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते २,००० तर सरासरी दर १,५०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक २,१८६ क्विंटल झाली. मृदुला वाणास ३,३०० ते ९,४०० तर सरासरी ६,५०० रुपये दर मिळाला. आंब्याची आवक ७,१७२ क्विंटल झाली. दशहरी व नीलम आंब्यास प्रतिक्विंटल किमान २,५००, कमाल ६,००० तर सरासरी ४,००० दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com