
Indian Agriculture:
परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवड योजना
सदर योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी ३९० रुपयांच्याप्रमाणे फळझाडे, भाजीपाल्याची कलमे/ रोपे पुरवठा करण्यात येतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम
फळपिके : आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ (बाणवली/ टीडी), बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर कलमे, द्राक्ष, ड्रॅगनफ्रुट, ॲव्हॅकेडो, केळी (३ वर्षे), सुपारी, साग, गिरीपुष्प, कडूलिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा,कडीपत्ता, पानपिंपरी, करंज आणि इतर औषधी वनस्पती.
फुलपिके : गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा
मसाला पिके : लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी.
यासाठी लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास आणि ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी.लाभार्थी जॉबकार्ड धारक असावा.योजनेसाठी जॉबकार्ड धारक खालील
‘अ’ ते ‘ज’ प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र राहील. अ) अनुसूचित जाती, ब) अनुसूचित जमाती, क) भटक्या जमाती, ड) निरधिसूचित जमाती ( विमुक्त जमाती), इ) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे, फ) स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, ग) दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी, ई) प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेखालील लाभार्थी,
ज) अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६(२००७ चा २) खालील पात्र व्यक्ती योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे / वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे ९० टक्के आणि कोरडवाहू पिकांचे ७५ टक्के झाडे जिवंत ठेवतील. अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. लाभार्थ्यांना ०.०५ हेक्टर ते २ हेक्टर क्षेत्राचे मर्यादेत फळझाड लागवड करता येते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत, असे शेतकरी भाग घेण्यास पात्र असतात. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे.
जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विहित प्रपत्रातील संमतिपत्र आवश्यक राहील.यापूर्वी महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.
योजनांच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.