Chana Procurement : ‘नाफेड’ची हरभरा खरेदी १४ मार्चपासून

राज्यात ‘नाफेड’च्या माध्यमातून किमान हमीदरानुसार (एमएसपी) हरभरा खरेदी १४ मार्चपासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी १५ मार्चपर्यंत करता येईल.
Harbhara Market
Harbhara MarketAgrowon
Published on
Updated on

NAFED Chana Procurement नांदेड : राज्यात ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून किमान हमीदरानुसार (एमएसपी) हरभरा खरेदी (Chana Procurement) १४ मार्चपासून सुरू होणार आहे.

याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी १५ मार्चपर्यंत करता येईल. हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकताही जाहीर केल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे यांनी कळविले आहे.

राज्यात रब्बी हंगाम २०२२-२३ साठी किमान हमीदरानुसार हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

या योजनेनुसार राज्यात शेतकऱ्यांचा आठ लाख १० हजार टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

यासाठी विक्रीपूर्व ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सोमवारपासून (ता. २७) सुरू केली आहे.

Harbhara Market
Chana Market : रब्बी हरभरा खरेदीला कधी मिळणार मुहूर्त?

ही नोंदणी प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहिल. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीची तारीख १४ मार्च निश्‍चित करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत होणारी हरभरा खरेदी सुरुळीत होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेप्रमाणे प्रतिशेतकरी हरभरा खरेदी करण्यात यावा, असे सुनंदा घड्याळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Harbhara Market
Chana Market : हरभरा नोंदणीसाठी झुंबड का उडाली?

दरम्यान यंदा आठ राज्यस्तरीय संस्थांच्या माध्यमातून हरभरा खरेदी होणार आहे. यात दि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई, विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाफार्मस प्रोड्युसर कंपनी लि. पुणे, पृथ्वाशक्ती एफपीसी, अहमदनगर, वॅपको, नागपूर, महाकिसान संघ कृषी प्रोड्युसर कंपनी लि. अहमदनगर, महाकिसान वृद्धी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नाशिक व महास्वराज्य फार्मर्स प्रोड्युसर कंपनी फेडरेशन देवळा, नाशिक या एजन्सीचा समावेश आहे.

Harbhara Market
Chana Procurement : नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी

जिल्हानिहाय खरेदीसाठी उत्पादकता (हेक्टरी, किलोमध्ये)

ठाणे ८००, पालघर ६७५, रायगड ९६०, रत्नागिरी ४९०, सिंधुदुर्ग शुन्य, नाशिक ९८५, धुळे १०५०, नंदुरबार १२३४, जळगाव १३५०, अहमदनगर ११५०, पुणे १२१०, सोलापूर ८४६, सातारा ११००, सांगली १०१२,

कोल्हापूर १२२५, ओंरगाबाद ८००, जालना १४५५, बीड १५००, लातूर १३००, नांदेड १५००, उस्मानाबाद ११५०, बुलडाणा १२९४, अकोला १५००,

वाशिम १२६५, अमरावती १५००, यवतमाळ १३५०, वर्धा १३५०, नागपूर १५००, भंडारा १२००, गोंदिया ८९६, चंद्रपूर ७५० व गडचिरोली ३८२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com