Team Agrowon
जळगाव जिल्ह्यातील वावडेत अजूनही शासकीय हरभरा खरेदीला सुरुवात झाली नाही.
त्यामुळे शासन हमीभावाने हरभरा खरेदी कधी करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाने दरवर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ जाहीर केला आहे.
मात्र बाजार समितीत हरभऱ्याला ३८०० ते ४५५० हा दर मिळत आहे.
मागील आठवडाभरापासून हरभऱ्याची आवकही वाढली आहे.
फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी सुरू केली नाही.
परिणामी, शेतकऱ्यांची क्विंटल मागे आठशे ते हजार रुपयाचे नुकसान होत आहे.
शासनाने फक्कड हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांसह शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.