Vegetable Market : नगरमध्ये कोबी, फ्लॉवरची अधिक आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात दर दिवसाला पावणे नऊशे क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली तर दर दिवसाला बटाट्याची साडेतीनशे क्विंटलपर्यंत आवक झाली.
Cabbage
CabbageAgrowon
Published on
Updated on

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात दर दिवसाला पावणे नऊशे क्विंटल भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) झाली तर दर दिवसाला बटाट्याची (Potato) साडेतीनशे क्विंटलपर्यंत आवक झाली. कोबी, फ्लॉवरची अधिक आवक आहे. मात्र दरात सतत चढउतार होत आहे. शेवग्याला बाजारात चांगली मागणी आणि दर असल्‍याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले.

Cabbage
Vegetable Cultivation : रसायनीत मळे लावणीची लगबग सुरू

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उपन्न बाजार समितीत मागील आठवड्यात दररोज टोमॅटोची ९३ क्विंटलची आवक होऊन ३०० ते ८०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. वांगीची ५३ क्विंटलची आवक होऊन ४०० ते २ हजार रुपयांचा दर मिळाला. कोबीची ७५ क्विंटलची आवक होऊन २५० ते ७५० रुपयांचा दर मिळाला. काकडीची ३५ क्विंटलची आवक होऊन ८०० ते २ हजार, गवारची ५ क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ९ हजार होते.

Cabbage
Cabbage Production : दर्जेदार कोबी उत्पादनात नाव मिळवलेले खामखेडा

घोसाळ्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते दोन हजार, दोडक्याची चार क्विंटलची आवक होऊन १२०० ते २५००, कारल्याची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ३ हजार, भेंडीची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते साडेतीन हजार रुपये, वाल शेंगाची १२ क्विंटलपर्यंत आवक होऊन ८०० ते २ हजार रुपये, घेवड्याची तीन क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते दोन हजार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. बटाट्याची दर दिवसाला साडेतीनशे क्विंटलपर्यंत आवक होऊन १४०० ते २ हजार, हिरव्या मिरचीची ६७ क्विटंलपर्यत आवक होऊन दीड हजार ते अडीच हजार, शेवग्याची ४ क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

शेवग्‍याला प्रती क्विंटल दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आद्रकाची ५० क्विंटलपर्यंत आवक होत असून २ हजार ते ४ हजार ७००, दुधी भोपळ्याची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १२००, शिमला मिरचीची ३० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते दोन हजार, मका कणसाची दररोज १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. मेथी, पालक, शेपू, करडी भाजी, कोथिंबीर याला मागणी असल्याचे सांगण्यात आले.

तीनशे क्विंटल फळांची आवक..

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला फळांची तीनशे ते सव्वा तीनशे क्विंटलची आवक होत आहे. संत्र्यांची १०० क्विंटलपर्यंत आवक होत असून संत्र्याला ५०० ते ६००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. डाळिंबाची ११ क्विंटलपर्यंत आवक होत असून १ हजार ते १२ हजार, सीताफळाची ७६ क्विंटलपर्यंत आवक होत असून १ हजार ते ६ हजार, पपईची १८ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ३ हजार रुपयांचा दर मिळाला. पेरूची २२ क्विंटलपर्यंत दर दिवसाला आवक होऊन ५०० ते २५०० रुपयांचा दर मिळाला. बोर, कलिंगड, खरबुजाची आवक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com