Mango Market : अमरावतीला आंब्याची रोजची आवक पोहोचली १६०० क्विंटलवर

Mango Arrival : अमरावती येथील फळ व भाजीपाला बाजारपेठेत हंगामी फळ पिकांची आवक वाढली आहे. त्यामध्ये आंबा आघाडीवर असून, दर दिवशी विविध जातींच्या आंब्यांची १६०० क्विंटल इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
Mango Market
Mango MarketAgrowon

Amravati News : अमरावती येथील फळ व भाजीपाला बाजारपेठेत हंगामी फळ पिकांची आवक वाढली आहे. त्यामध्ये आंबा आघाडीवर असून, दर दिवशी विविध जातींच्या आंब्यांची १६०० क्विंटल इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. यापुढील काळात आंबा आवक वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

फळांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या आंब्याला ग्राहकांची सध्या मागणी आहे. त्यामुळेच बाजारात आवक देखील वाढती असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी बेगनपल्ली तसेच नीलम या जातीच्या आंब्याची आवक बाजारात होत होती.

आता मात्र चवीत वेगळेपण जपणाऱ्या आंब्याला मागणी वाढल्याने नीलम या शर्यतीत मागे पडल्याचे चित्र आहे. परिणामी, नीलम जातीच्या आंब्याची आवक आता होत नसल्याची माहितीदेखील व्यापारी सूत्रांनी दिली.

Mango Market
Hapus Mango Market : कर्नाटक हापूसचे अतिक्रमण चिंताजनक

बाजारात होणाऱ्या विविध जातीच्या आंब्यांपैकी हापूसला सर्वाधिक हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. हापूस आंब्याची रोजची आवक २१० क्विंटल इतकी आहे. हापूस पाठोपाठ बाजारात केसर आंबादेखील भाव खात आहे. केसर आंब्याला सहा हजार ते आठ हजार रुपये असा दर मिळत असून याची आवक १७० क्विंटल इतकी आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत विदर्भात देखील केसर आंब्याखालील क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा परिसरा देखील केसर आंबा लागवडीला जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देखील त्यांच्या प्रक्षेत्रावर यंदा केसर आंबा लागवड केली जाणार आहे. यातून चांगला पैसा होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

हापूस व केसर नंतर आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा या राज्यातून बैंगनपल्ली जातीच्या आंब्याची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ही आवक सर्वाधिक ४७० क्विंटल असून, ३००० ते ४००० रुपये दराने बैंगनपल्ली आंब्याचे व्यवहार होत आहेत.

Mango Market
Kesar Mango : मराठवाड्याच्या ‘केसर’ची अपेक्षेप्रमाणे आवक नाहीच

चरकुलस जातीच्या आंब्याला देखील तीन हजार ते चार हजार रुपये असा दर मिळत असून, त्याची आवक २५० क्विंटलच्या घरात आहे. हा आंबा आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकमधून बाजारात दाखल होतो. २९० क्विंटल आवक होणाऱ्या लाल पट्टा आंब्याला २५०० ते ३५०० रुपये असा दर शनिवारी (ता. ११) मिळाला.

लालपट्टा आंब्याचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तोतापुरी आंब्याची आवकदेखील ३०० क्विंटलपेक्षा अधिक आहे. या आंब्याला २५०० ते ३००० रुपये सध्या बाजारात मिळत आहे. येत्या काळात या आंब्याची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

टरबूज-खरबुजाची आवक नियमित

हंगामी फळ असलेल्या आंब्यासोबतच बाजारात उन्हाळी फळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टरबूज आणि खरबूज या दोन्ही फळांची आवक होत आहे. टरबूज आवक २७०, तर खरबूज आवक १४० क्विंटल इतकी होती.

टरबुजाचे व्यवहार १२०० ते १५०० रुपयांनी होत असून खरबुजाची विक्री १४०० ते १६०० रुपये क्विंटलने होत आहे. टरबूज हंगाम सध्या अंतिम टप्प्यात असल्याने आवक यापुढील काळात कमी होईल, अशी शक्यता देखील व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com