Lumpy virus : लम्पी आजारापासून जनावरांना वाचवण्यासाठी घरच्या घरी हे उपाय महत्त्वाचे ठरतील !

Team Agrowon

प्रथिनयुक्त ढेप

जनावराला हिरवा, मऊ चारा आणि प्रथिनयुक्त ढेप द्या.  सतत पाणी पिल्यामुळे जनावनर लवकर बरे होण्यास मदत होते. 

Lumpy virus | Agrowon

मिठाच्या पाण्याचे कापड

ज्या जनावरांना पायासमोरिल पोळीवर, पायावर किंवा छातीवर सूज त्यांना मिठाच्या गरम पाण्यात सुती कापड बुडवून २ वेळा शेक द्या.

Lumpy virus | Agrowon

लेप लावा

ज्या ठिकाणी सूज आलेली आहे तिथे बोरिक पावडर आणि ग्लिसरिन चा लेप तयार करुन सुजेवर सकाळ संध्याकाळ लावा. 

Lumpy virus | Agrowon

नाकापुड्या स्वच्छ करा

नाकपुड्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी स्वच्छ करावी. दोन्ही नाकपुड्या बोरोग्लिसरीन किंवा कोमट खोबरेल तेलात बोरीक पावडर मिसळून मीश्रण तयार करावे. या मिश्रणाचे चार -चार थेब नाकपुड्यात टाकावेत.

Lumpy virus | Agrowon

डोळ्यांसाठी हा उपाय

डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते. पुढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने धुवावेत किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

Lumpy virus | Agrowon

जखमांवर उपाय

प्राण्यांना जखमा झाल्यास  ०.१ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट च्या द्रावणाने धुवाव्यात. त्यानंतर या जखमावर टिंक्चक आयोडीन लावा. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट व ल्गिसरीनचे मिश्रण लावून बॅंडेजने हुळूवारपने बांधा. 

Lumpy virus | Agrowon
Lumpy virus | Agrowon
आणखी वाचा