श्रीलंकेतील आर्थिक समस्या भारताच्या पथ्थ्यावर पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण श्रीलंकेकडून कोकोनट तेल खरेदी करणारे खरेदीदार आता भारतीय कोकोनट तेलाची (Coconut Oil) मागणी करत आहेत.
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे तेथील कोकोनट तेल उत्पादकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम कोकोनट तेलाच्या (Coconut Oil) निर्यातीवर झाला आहे. श्रीलंकेच्या कोकोनट तेलाचे खरेदीदार पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांकडे आपली मागणी नोंदवत असल्याचे समोर आले आहे. बिझनेस स्टॅंडर्डने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
आजवर श्रीलंकेकडून खरेदी करणाऱ्या युरोप आणि ऑस्ट्रेलियातील कोकोनट तेलाच्या खरेदीदारांनी आपल्याकडे मागणी नोंदवली असल्याचे 'केराफेड'चे व्यवस्थापकीय संचालक आर.अशोक यांनी म्हटले आहे. कोकोनट तेलाशिवाय (Coconut Oil) प्रक्रिया केलेले कोकोनट पावडर, दूध पावडर अशा मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांनाही जर्मनी, मलेशियाकडून मागणी नोंदवण्यात आली आहे.
केराफेड ही भारतातील सर्वाधिक मोठी कोकोनट तेल उत्पादक कंपनी असून महिन्याकाठी १ हजार टन कोकोनट तेलाचे उत्पादन करते. कोकोनट तेलाची (Coconut Oil) देशांर्तगत मागणी पुरवणे केराफेडला शक्य होत नाही. मात्र आता देशाबाहेरूनही कोकोनट तेलाला मागणी होत असल्यामुळे केराफेड करुंगपल्ली येथील उत्पादनकेंद्राची क्षमता वाढवणार असल्याचे अशोक म्हणाले आहेत.
या केंद्रात सध्या दिवसाकाठी ९० टन उत्पादन घेतले जाते, ते दिवसाकाठी २५० टनांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ लागेल, असेही अशोक यांनी नमूद केले आहे.
केराफेडकडून येत्या काळात शुद्ध कोकोनट तेल (Pure Coconut Oil), लहान मुलांच्या मालिशसाठीचे तेल, हेअर ऑइल, पॅकबंद नारळपाणी, नारळाचे वेपर्स अशी अनेक उत्पादने आखाती देशात निर्यात करण्यात येणार आहेत.
कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, पॉलिमरचे वाढलेले दर यामुळे केराफेडने अलीकडील काळात कोकोनट तेलाचे उत्पादन कमी केले होते. त्यात रशिया युक्रेन संघर्षामुळे भर पडली आहे. बाजारात कोकोनट तेलाचे दर १६३ रुपये प्रति किलोवरून २७७ रुपयांवर गेले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.