Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त होऊनही देशात खाद्यतेल महाग का ? |

अमेरिकेच्या कृषी विभागानं यंदा जागतिक खाद्यतेल उत्पादन ४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. गेल्या हंगामात जगात २ हजार ८९ लाख टन खाद्यतेल उत्पादन झालं होतं. तर यंदा २ हजार १७५ लाख टनांवर उत्पादन पोचेल, असं युएसडीएनं म्हटलंय.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

सोयाबीनच्या दरात सुधारणा
1. देशातील बाजारात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीनचे दर नरमले होते. तेव्हापासून डिसेंबर संपला तरी दर कायम होते. मात्र याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली होती. त्यामुळं शेतकरी संभ्रमात होते. मात्र जानेवारीत दर सुधारतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. सोयाबीन दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

कपासू दरातील वाढ कायम

2. देशातील बाजारात कापसाचे नरमलेले दर मागील चार दिवसांपासून सुधारत आहेत. आजही देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत वाढले होते. आज देशात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यातही यादरम्यान भाव होता. शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या अपेक्षित दरपातळीवर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केल्यास फादेशीर ठरेल, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय. 

बोरांना कमी उठाव

3. राज्यातील बाजारात आता बोरांची आवक सुरू झाली. मात्र बदलते वातावरण आणि राज्यातील अनेक भागांमध्ये सौम्य आजारांची साथ सुरु होती. त्यामुळं बोरांना जास्त उठाव मिळाला नाही. त्यामुळं बोरांना सरासरीपेक्षा कमी दर मिळतोय. सध्या बोरांना २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र पुढील काळात बोरांना चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तर आवक वाढेल. त्यामुळं बोरांचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

बीटला मिळतोय सरासरी दर 

4. बाजारात सध्या बीटला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. सध्या बीटची बाजारातील आवकही मर्यादीत आहे. मात्र उठाव कमी असल्यानं दरही तुलनेत कमीच आहेत. सध्या बीटला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काळात बीटची बाजारतील आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं बीटचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate
Cotton Rate : आठवडाभरात कसा राहीला कापूस बाजार?

सरकारच्या खाद्यतेल आयातशुल्क कपातीचा सोयाबीनवर काय परिणाम झाला?

5. अमेरिकेच्या कृषी विभागानं यंदा जागतिक खाद्यतेल उत्पादन ४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. गेल्या हंगामात जगात २ हजार ८९ लाख टन खाद्यतेल उत्पादन झालं होतं. तर यंदा २ हजार १७५ लाख टनांवर उत्पादन पोचेल, असं युएसडीएनं म्हटलंय. यंदा जगात सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ३ हजार ९११ लाख टनांवर असलेलं सोयाबीन उत्पादन यंदा ३ हजार ५५६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आहे. पण जागतिक सोयाबीन उत्पादनातील ही वाढ अर्जेंटीना आणि ब्राझील या दोन देशांमध्ये उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने होणार, असं युएसडीएनं स्पष्ट केलं. पण सध्या अर्जेंटीना दुष्काळाच्या झळा सहन करतोय.

तर ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं युएसडीएचा सोयाबीन उत्पादनाचा अंदाज चुकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जगात खाद्यतेल उत्पादन वाढणार आहे. मागील वर्षातही उत्पादन २०२१ च्या तुलनेत वाढलं होतं. तसंच पुरवठाही सुरळीत झाला होता. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र देशात वाढलेले खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. आयात स्वस्त झाली, मात्र विक्रीचे दर कायम राहीले. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचं कारण देत दर वाढवण्याऱ्या उद्योग आणि वितरकांनी आता दर कमी झाल्यानंतर विक्रीचे दर मात्र कमी केले नाहीत. सरकारलाही या प्रकरणात लक्ष घालण्यात रस नाही. मात्र देशातील खाद्यतेलाचे दर कमी होत नाही म्हणून आयातशुल्क कमी ठेवले आहे. याचा थेट फटका मात्र शेतकऱ्यांना बसतोय. सरकारने खाद्यतेलावरील आातशुल्क वाढवल्यास सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com