Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारदेशात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव मागील २ दिवसांमध्ये ३०० रुपयांपर्यंत वाढून पुन्हा १५० रुपयांपर्यंत नरमले आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक मर्यादीत आहे. त्यामुळे काहीसे चढ उतार दिसत असले तरी सोयाबीनची भावापातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस स्थिरदेशातील बाजारात कापसाचा भाव आज स्थिरावला होता. सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. सीसीआयच्या कापूस खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारातील कापसाची आवकही सरासरीपेक्षा काहीशी अधिक दिसत आहे. कापसाला सध्या बाजारात ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदी देशात १०५ लाख गाठींवर पोचली आहे. तर सीसीआय कापसाची विक्रीही करत आहे. युध्दाचाही कापसाच्या भावावर परिणाम दिसत आहे. त्यामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: केळीला चांगला उठाव; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसात चढ उतार, आल्याचे भाव टिकून तर गवारचे भाव तेजीत.गहू दबावातदेशातील बाजारात गव्हाचे भाव काहीसे दबावात आहेत. रब्बीतील नव्या गव्हाची बाजारातील आवक सुरु झाली आहे. सध्या काही भागात काढणी सुरु झालेली आहे. पुढील काही दिवसांमध्ये काढणीला वेग येऊन बाजारातील आवकेचा दबावही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाचे भाव काहीसे दबावात आले आहेत. सध्या बाजारात गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. गव्हाची बाजारातील आवक वाढण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या भावावरील दबाव कायम राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Pomegranate Farmer Issue: हस्त बहरातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात.बेदाण्याला उठावदेशातील बाजारात बेदाण्याला सध्या चांगला उठाव आहे. रमजान महिन्याची मागणी आल्याने दराला आधारही मिळत आहे. आखातातील निर्यातीवर परिणाम झाला असला तरी देशात मागणी आहे. देशात सध्या बेदाण्याचा पुरवठा सरासरीपेक्षा कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या बेदाणा सरासरी १५ हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. बेदण्याला पुढील काळातही चांगला उठाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे बेदण्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .भेंडीचे दर टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव मात्र चांगला आहे. भेंडी पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. यामुळे बहुतांशी बाजारांमध्ये भेंडीची आवक कमी असून दराला आधार मिळत आहे. सध्या भेंडीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. भेंडीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्तकेला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.