Market Bulletin: सोयाबीन टिकून देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. बाजारातील आवक कमीच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचा भाव एका पातळीच्या दरम्यान कायम आहे. सोयापेंडचा भावही स्थिर दिसत आहे. यामुळे देशातही सोयाबीनच्या भावाला आधार आहे. सध्या देशात सोयाबीन सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात सोयापेंडचा भावही टिकून आहे. सोयापेंडचा भाव वाढल्याने निर्यात कमी झाल्याचे निर्यातदार सांगत आहेत. यामुळे सोयाबीनच्या भावात स्थिरता आलेली आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाला मागणी कायमदेशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. वाढलेल्या भावात कापसाचा उठाव काहीसा कमी झाला तरी कापसाची उपलब्धताही कमी आहे. यामुळे कापसाचा भाव टिकून आहे. देशात कापूस मागील तीन आठवड्यांपासून एकाच भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. कापसाला आजही सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील तेजी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केल आहे. .Hapus Mango Price: आंबा हंगाम अंतिम टप्प्यात, डझनाला दर ३०० ते ४०० रुपये.कोथिंबीरला उठावराज्यातील बाजारांमध्ये मागील काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक कमी झालेली आहे. वाढलेल्या उष्णतेच्या कोथिंबीर पिकाला अनेक भागात फटका बसला. तर पाण्याची टंचाईही अनेक भागात जाणवल्याने कोथिंबीर आवकेवर परिणाम दिसत आहे. मागील दोन आठवड्यांपासून बाजारातील आवक कमी दिसत आहे. याचा आधार कोथिंबीरच्या भावाला मिळत आहे. सध्या कोथिंबर प्रतिशेकडा १३०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. तर प्रतिक्विंटल ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कोथिंबीर आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरचा दरही टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनला उठाव; कापूस तेजीतच, कांदा दबावातच, आले दराला आधार तर लिंबू दरात नरमाई.गवारची आवक कमीचराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कमीच आहे. तर उठाव असल्याने गवारचा भाव टिकून आहे. गवारला मागणी वर्षभर बऱ्यापैकी दर मिळाल्याचे शेतकरी सांगत आहे. गवारची लागवड सातत्याने कमीच राहीली. तसेच पिकाला पावसाचा आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आला. याचा परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. गवारची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भावही टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..गहू स्थिरावलादेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून गव्हाची आवक कमी झालेली आहे. तर गव्हाला सध्या चांगला उठाव आहे. यामुळे दरही स्थिरावले आहेत. सरकारची गव्हाची खरेदीही वाढलेली आहे. पुढील हंगामात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने गव्हाला उठाव चांगला मिळत आहे. सध्या बाजारात गव्हाला गुणवत्तेप्रमाण २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांनंतर बाजारातील गव्हाची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. याचा गहू बाजाराला चांगला आधार मिळेल, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.