Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या भावात चांगली वाढ झाली. ही वाढ कशामुळे याची सविस्तर माहीती तुम्हाला आज रात्री ८ वाजता मिळेलच. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत एक टक्क्याने वाढून १२.१० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयापेंडचे वायदेही ३७३ डाॅलरवर पोचले होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव स्थिर होता.

सोयाबीन आजही देशात ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकल्यानंतर देशातील बाजारातही दर सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस बाजारावरील दबाव कायम आहे. कापसाचे वायदे पुन्हा कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजरात कापूस वायदे ७५.५६ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५७ हजार २०० रुपयांपर्यंत नरमले. बाजार समित्यांमधील आवकही कमी आहे.

मात्र सट्टेबाजीमुळे मार्केटवर दबाव असल्याने भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आली. कापसाच्या बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे. टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

किमान भाव ६०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे. सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे. तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.

त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com