Agrowon Podcast : गव्हाला सध्या काय भाव मिळतोय?

Wheat Procurement : नाफेडने देशभरात आतापर्यंत २५९ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

१) सोयाबीन बाजार दबावात (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात आज नरमाई पाहायला मिळाली होती. सोयाबीनचे वायदे आज १३.५५ डाॅलर प्रतीपाऊंडवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४२५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनची भावपातळी कायम आहे.

सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस स्थिर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) कापूस दरात नरमाई (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाचे भाव आजही दबावात आहेत. कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. सध्या बाजारात कापसाची आवक ९० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे, असे व्यापारी सांगत आहेत. एरवी कापसाची आवक २० हजार गाठींच्या दरम्यान असायची.

बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याने दरही दबावात आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाचे भाव काही दिवस दबावात राहण्याचा अंदाज आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

३) आले दरातील तेजी टिकून (Ginger Rate)

बाजारात सध्या आल्याची आवक कमी होत आहे. पण आल्याला सध्या चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे आल्याचे भाव तेजीत आहेत. सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे.

आल्याला निर्यातीसाठीही मागणी येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आल्याची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

Wheat Procurement
Onion Subsidy : सांगली जिल्ह्यातील ३९५० शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

४) कांद्यावरील दबाव कायम (Onion Rate)

कांद्याचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात आहेत. लाल कांद्याला यंदा उत्पादन खर्चाच्या निम्माच भाव मिळाला. कांद्याचे भाव दबावात होते त्यामुळं लाल काद्याला तरी चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण लाल कांद्यालाही यंदा कमीच भाव मिळत आहे. बाजारातील लाल कांद्याची आवक वाढत आहे.

कांद्याला पावसाचा फटकाही बसला. पण सधअया दर दबावात आहेत. कांद्याला प्रतिक्विंटल सरसरी ८०० ते १ हजार रुपयाचा भाव मिळतोय. कांद्याचे भाव पुढील काळात स्थिर राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) सध्या गव्हाला काय भाव मिळतोय? (Wheat Rate)

नाफेडने देशभरात आतापर्यंत २५९ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता. परिणामी बाजारात गव्हाच्या दरात तेजी आली होती. गहू दराने विक्रमी टप्पा गाठला होता. नवा गहू बाजारात येणाच्या काळात खुल्या बाजारात गव्हाचे भाव प्रतिक्विंटल १९०० ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते.

त्यामुळे यंदाही सरकारला एक वर्षपुर्वीच्या खरेदीचा टप्पा गाठला येणार नव्हता. त्यामुळे यंदा नाफेडने ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. सरकारला आतापर्यंत २५९ लाख टन खरेदी करता आली. तर यंदा सरकारची खरेदी २६० ते २७० लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Wheat Procurement
Wheat Procurement : सरकारची गहू खरेदी ४१ टक्क्यांनी वाढली

सरकारने यंदा देशात १ हजार १२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. पण पावसाने गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गहू उत्पादन सरकारच्या अंदाजपेक्षा कमीच राहील, असा अंदाज व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सरकारकडे मागील हंगामातील शिल्लक साठा खूपच कमी आहे.

गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव पुढील काळात तेजीत येऊ शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com