Market Bulletin: सोयाबीन दर टिकूनराज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत. बाजारातील आवक कमीच आहे. तर उठाव मात्र चांगला आहे. राज्यातील बाजारात सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल ५ हजार ६०० ते ६ रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांटसच्या खरेदी दराने ६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातही सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनला उठाव कायम राहील. यामुळे सोयाबीन भावातील सुधारणाही पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसाचे भाव टिकूनदेशातील बाजारात मागली काही दिवसांपासून कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाला सध्या उठाव चांगला आहे. कापड निर्मितीसाठी कापसापासून तयार होणाऱ्या सुताला मागणी वाढली आहे. या मागणीमुळे कापसाच्या भावातही सुधारणा झाली आहे. कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या पुढे सरकला आहे. कापसाचा भाव सरासरी ८ हजार ते ८ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सीसीआय कापूस विक्रीचे भाव वाढवत आहे. कापसाला मागणी असल्यामुळे दरातील सुधारणा पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Eggs Production: सांगलीत अंडी उत्पादनात ८ लाखांची घट.कारल्याला मागणीचा आधारराज्यातील प्रमुख कारले बाजारात आवक कमीच आहे. तर उठावही चांगला आहे. त्यामुळे दराला काहीसा आधार मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजारात कारल्याला प्रति क्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. अवकाळीसह झालेल्या गारपीटीने आणि उष्णतेच्या लाटांनी कारले उत्पादनाला फटका बसत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. परंतु कारल्याला मागणी चांगली असल्याने दराला आधार मिळत आहे. पुढील दोन आठवड्यात कारल्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकार व्यापारी आणि अनुभवी शेतकरी व्यक्त करत आहेत..Chana Procurement Stopped: राज्यभर हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प.टरबूजाला उठावउन्हाचा चटका वाढल्याने टरबूजाची मागणी वाढली आहे. प्रमुख बाजारात मागील काही आठवड्यात टरबूजाचे दर दबावात होते. परंतु आता टरबूज दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. बाजारातील टरबूजांची आवक कमी आहे. तर उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसून येत आहे. सध्या प्रमुख बाजारात गुणवत्तेनुसार सरासरी प्रति क्विंटल ८०० ते १ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. उष्णतेच्या लाटांमुळे टरबूज पिकाला झळ बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पुढील दोन ते तीन आठवडे टरबूजाची मागणी टिकून राहील. त्यामुळे टरबूज दर टिकून राहतील, असा अंदाज टरबूज उत्पादक शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत..हरभरा दबावातदेशात यंदा हरभरा उत्पादन चांगले झाले असून आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारभाव दबावात आहेत. राज्यातील बाजारात हरभरा आवक कमीच आहे. केंद्र सरकारने हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ८७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजारात ५ हजार ते ५ हजार २०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्रावर विक्रीकडे वळाले आहेत. परंतु खरेदीची मुदत २९ एप्रिलपर्यंत असली, तरी जिल्हानिहाय मर्यादा संपल्यामुळे बहुतांश ठिकाणी खरेदी थांबली आहे. त्यामुळे हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. चांगल्या उत्पादनासह आयातीच्या लोंढ्यामुळे हरभरा दर पुढील काळातही दबावात राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.