Market Bulletin: सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात आज सोयाबीनचा भाव स्थिरावला होता. मागील आठवडाभरात सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. बाजारातील आवकही कमी झाली आहे. खुल्या बाजारात भाव वाढल्याने सोयाबीनची हमीभावाने खरेदीही कमी झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ४५० ते ५ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे दराला चांगला आधार राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे. .कापूस आवक कमीचदेशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून कमीच आहे. बाजारात दरवाढ झाल्यानंतर आवक कमी झालेली आहे. कापसाच्या भावात मागील ४ दिवसांपासून पुन्हा काहीसे चढ उतार सुरु झाले आहेत. देशात कापूस उत्पादन वाढीचे अंदाज येत आहे. तर सीसीआयही कापसाची विक्री करणार आहे. याचा काहीसा परिणाम बाजारावर दिसत आहे. कापसाचा भाव ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे. तर कमाल दर ८५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कापसाची आवक कमी राहून दराला आधार मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .India Sugar Production: देशाचे साखर उत्पादन दीडशे लाख टनांवर.उडदाचा भाव दबावातचदेशातील उडीद उत्पादन यंदा कमी झाले आहे. राज्यातील लागवड आणि उत्पादनही कमी झाले आहे. परंतु आयात चांगली असल्याने कडधान्याचा साठा देशात तयार होऊन भाव दबावात आले आहेत. सध्या बाजारातील आवक कमी असूनही भाव कमी आहेत. सध्या उडीद सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. उडदाची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने उडीद विक्री करावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. .Fenugreek Price Crash: भावाअभावी मेथीत बकऱ्या सोडण्याची वेळ.गाजरला उठावराज्यातील बाजारात गाजराला चांगला उठाव मिळत आहे. मागील काही दिवसांपासून गाजराची बाजारातील आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे मागणी असल्याने दर टिकून आहेत. सध्या गाजराला सरासरी १५०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे. राज्यातील केवळ मोठ्या बाजारांमध्येच सध्या गाजराची आवक काहीशी चांगली दिसत आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .लसणाचा भाव टिकून राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लसणाचे भाव टिकून आहेत. लसणाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. यंदा लसूण उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे लसणाचे भाव टिकून आहेत. सध्या लसणाला राज्यात सरासरी ६ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसणाचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.