उडदाचे भाव दबावातराज्यातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे. परंतु उडदाला खूपच कमी भाव मिळत आहे. उडदाचा हमीभाव ७८०० रुपये आहे. परंतु सध्या बाजारात उडदाला सरासरी ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा पावसामुळे उडीद पिकाला जोरदार दणका दबला. त्यामुळे उडदाची गुणवत्ता कमी झाली. कमी गुणवत्ता असलेला उडीद बाजारात अगदी ४५०० रुपयांपासून विकला जात आहे. ऐन उडीद काढणीच्या काळात पावसाने नुकसान केले. त्यामुळे पुढील काळातही गुणवत्तापूर्ण उडदाची बाजारातील आवक मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .सिताफळाला मागणीराज्यातील बाजारात सिताफळाची आवक कमीच आहे. पावसाचा सिताफळाला जोरदार दणका बसला. सिताफळांची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच आहे. पण दुसरीकडे सिताफळाला उठाव मिळत आहे. सध्या सिताफळाला पुणे, मुंबई, नागूपर, नाशिक अशा बाजारात ४ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तर गुणवत्तापूर्ण मालाचा कमाल भाव ८ हजार ते ९ हजारांच्या दम्यान आहे. गुणवत्ता कमी असलेला माल बाजारात अगदी १ हजारांपासून दर मिळत आहे. सिताफळाचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज फळबाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव कमीच; मक्याचा भाव दबावातच, सोयाबीन भाव स्थिर, कापूस तसेच मिरचीचे दर टिकून.बाजरी दबावातचखरिपातील बाजरीची बाजारात आवक सुरु आहे. बाजरी पिकालाही पावसाचा राज्यात फटक बसला. मात्र इतर राज्यांमधील आवक सध्या वाढलेली आहे. याचा दबाव दरावर येत आहे. बाजरीला सध्या उठाव मर्यादीत आहे. मात्र पुढील काळात उठाव वाढण्याची शक्यता आहे. तरीही सध्या बाजारीचे भाव २२०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. चांगल्या गुणवत्तेची बाजरी बाजारात ३ हजारांपर्यंतही दर मिळत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील बाजरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..Soybean Procurement: बीड जिल्ह्यातील २३ केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी.लिंबाचे दर स्थिरराज्यातील बाजारात लिंबाचे भाव स्थिर आहेत. बाजारातील आवक कमीच आहे. मात्र दुसरीकडे बाजारात लिंबाला उठाव मर्यादीत आहे. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल २५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पावसाचाही लिंबाला दणका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. सध्याही काही भागात पाऊस पडत असल्याने लिंबाच्या काढणीवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. लिंबाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे. दरात मात्र काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला..जिऱ्याचे भाव टिकूनदेशातील बाजारात जिऱ्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. ऑक्टोबर महिन्यात जिऱ्याला दिवाळीची मागणी राहीली. त्यामुळे दरालाही आधार मिळाला. देशातील जिऱ्याचे उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यापुढील काळात जिऱ्याला लग्नसराईमुळे मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या जिरा प्रतिक्विंटल सरासरी १७ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. तर राज्यातील बाजारात २२ हजार ते २५ हजार रुपये भाव आहे. जिऱ्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.