Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारसोयाबीनच्या भावात मागील ५ दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे. मात्र वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाल्याने दरवाढीला लगाम बसला आहे. सोयाबीनची देशात सध्या उपलब्धता कमी आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीन भावात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची वाढ केली होती. तर बाजार समित्यांमधील दरपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज असला तरी वाढलेल्या भावात उठावही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार होऊ शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस भाव टिकूनदेशातील बाजारात कापसाचा भाव टिकून आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. दुसरीकडे मागणी असल्याने तेजी आली आहे. मानवनिर्मित कापड महाग झाले आहे. याचा कापसाला आधार मिळाला. बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव आजही तेजीच होता. कापूस आज ८ हजार ६०० ते ९ हजारांच्या दरम्यान विकला गेला आहे. कापसाची आवक दरवाढल्यानंतही वाढलेली नाही. सध्या सीसीआय कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहे. बाजारातील स्थिती पाहता कापसाचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव.टोमॅटो आवक कमीचराज्यातील बाजारात वाढत्या उन्हामुळे टोमॅटोची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. तर टोमॅटोला लग्न सराई आणि समारंभामुळे मागणी होती. यामुळे टोमॅटोच्या भावात झालेली वाढ कायम आहे. बाजारात सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात बहुतांशी प्लाॅट्स संपले असून कमी प्लाॅटचा तोडा सुरु असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच पिकाला उन्हाचाही फटका बसत आहे. यामुळे भावात पुढील काही आठवडे वाढू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?.वांग्याला उठावराज्यातील बाजारात वांग्याला सध्या चांगला उठाव मिळत आहे. लग्न सराईच्या काळात वांग्याला मागणी होती. यामुळे बाजारात वांग्याचे भाव टिकून होते. वांगाल्या राज्यातील बाजारात सरासरी १९०० ते २३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यातील बाजारात वांग्याची आवक काहिशी चांगली आहे. या बाजारांमध्ये वांगी १३०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. तर मुंबई बाजारात भाव ३ हजारांच्याही पुढे दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारातील वांगी आवक काहीशी कमी होऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..हळद स्थिरराज्यातील बाजारात हळदीची आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. आवकेचा दबाव काही प्रमाणात काही बाजारांमध्ये कमी दिसत आहे. याचा दराला आधार मिळत असून हळदीचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. हळदीला मागणी चांगली आहे तर उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणेचे संकेत आहेत, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.