Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणा सोयाबीनच्या भावात मागील काही दिवसांपासून सुधारणा कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी झालेली आहे. सोयाबीनला सध्या तेल आणि सोयापेंडसाठी मागणी आहे. यामुळे सोयाबीनचा भाव तेजीत आला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील तेजीही टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसातील तेजी टिकूनकापसाच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून टिकून आहे. कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. सध्या बाजारात कापूस सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ४०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाच्या भावातील तेजी टिकून आहे. पण कापसाचे भाव वाढल्याने कापडाची मागणी कमी होत असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील तेजीही काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Fertilizer Shortage: खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट.लिंबू आवक घटलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी झालेली आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसाचा अनेक भागातील लिंबू बागांना फटका बसला आहे. सध्या कमी माल उपलब्ध असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी आणि लिंबाला चांगली मागणी असल्यामुळे दरात वाढ दिसून आली आहे. वाढलेल्या उन्हामुळेही मागणी वाढलेली आहे. सध्या बाजारात लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Onion Procurement Controversy: ‘एनसीसीएफ’विरोधात पोलिसांत तक्रार.हळदीची आवक स्थिरदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात हळद प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..काकडीला उठावकाकडीलाही सध्या बाजारात चांगला उठाव मिळत आहे. तर दुसरीकडे काकडीची आवक स्थिरावली आहे. तर काही बाजारांमधील आवक कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या काकडीचा प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ४०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडी पिकाला वाढत्या उन्हाचा फटकाही बसत आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काकडीची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला कायम राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.