Market Bulletin: सोयाबीन भाव टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज टिकून होता. सोयाबीनला सरासरी भाव सध्या ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ८०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस भावात नरमाईदेशातील बाजारात मागील ३ दिवसांपासून कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाचे भाव अनेक ठिकाणी हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर काही भागात सरासरी भाव हमीभावाच्याही खाली गेला आहे. सध्या बाजारात कापूस ७ हजार ९०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सीसीआय कापसाची विक्री करत आहे आणि सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क काढले. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. कापूस भावात काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Sindhudurg Cashew Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला प्रारंभ.तूर तेजीतचदेशतील बाजारात तुरीच्या भावात झालेली वाढ कायम आहे. बाजारभाव हमीभावाच्या पुढे सरकलेला आहे. यंदा देशात तुरीचे उत्पादन घटले आहे. तसेच सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. तर बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई कायम आहे. याचा आधार दराला मिळाला. तुरीचे भाव सध्या बहुतांशी बाजारात ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीची बाजारात आवकही वाढलेली आहे. तुरीचे भाव यंदा टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे. त्यामुळे तुरीचे भाव टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Banana Export Khandesh : निर्यातक्षम केळीला खानदेशात २२०० रुपये दर.पपईला उठावपपईला सध्या उठाव चांगला आहे. उन्हाचा चटका वाढत आहे तसा पपईला मागणी वाढत आहे. राज्यातील बाजारात पपईची आवक सध्या कमीच आहे. पपईची अनेक बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील केवळ मुंबई, पुणे, अमरावती बाजारात अधिक आवक आहे. इतर बाजारांमध्ये आवक २० ते ५० क्विंटलच्या आतच होत आहे. त्यामुळे पपई प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पपईची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहून दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. .हळदीमध्ये चढ उतारहळदीच्या भावात मागील आठवडाभरापासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. मसाले उद्योगाकडून आणि निर्यातीसाठी मागणी असल्याने दराला आधार आहे. तसेच बाजारातील हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या देशात हळद सरासरी १४ हजार ते १६ हजार रुपयाने विकली जात आहे. मुंबई मार्केटला २० हजारांचा भाव मिळत आहे. तर हिंगोलीत १५ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहेत. रिसोड आणि वसमत मार्केट १४ हजार ते १५ हजारांच्या दरम्यान आहे. बाजारातील हळदीची आवक पुढील महीनाभरानंतर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.