Market Bulletin: सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतारदेशातील बाजारात दोन दिवसांपासून सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनची बाजारातील आवकही कमीच आहे. तर उठाव टिकून आहे. वाढलेल्या भावात सोयापेंडचा उठाव स्थिरावला आहे. यामुळे दरवाढीला ब्रेक लागला असून भाव पातळी स्थिरावली आहे. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस काहीसा नरमलादेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव कमी केला आहे. वाढलेल्या भावात कापसाचा उठाव कमी झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे पाॅलिस्टरचेही भाव कमी झाले आहेत. याचाही दबाव दरावर आला आहे. कापसाला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडींचा कापसाच्या भावावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Ethanol Blending: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण कायम.टोमॅटो भावात सुधारणाराज्यातील बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढले आहेत. मागील काही आठवड्यांपासून बाजारातील आवक कमी होत आहे. राज्यभरातच नाही तर देशभरातील टोमॅटो पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला. पाणीटंचाईमुळे अनेक भागात तोटा कमी झाला आहे. याचा परिणाम बाजारावर जाणवत आहे. सध्या बाजारात टोमॅटो सरासरी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पुढील काही काळ पाणीटंचाई आणि उष्णता तसेच त्यानंतर पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. टोमॅटोची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. याचा दराला आधार मिळेल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Onion Farmer Issue: व्यापाऱ्यांनी कांदा-मका खरेदीचे पैसे थकवले; संतप्त शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा.तुरीची आवक कमीचदेशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास पोचला आहे. पण दरपातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसत आहे. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसत आहे. तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसत आहे. सध्या तूर बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभुमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .शेवगा स्थिरावलाराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक स्थिरावली आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यामुळे भावातही काहीशी सुधारणा दिसून आली. शेवग्याला उठावही चांगला आहे. त्यामुळे शेवगा ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिरावण्याची शक्यता आहे. तर शेवग्याची मागणीही टिकून राहण्याचा अंदाज आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेवग्याच्या आवकेवरही परिणाम होण्याची शक्यता भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.