Tur Stock: तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न मिटला; सरकार आता खासगी गोदामांमध्ये तूर साठवणार

Government Decision: सरकारने गव्हाच्या साठ्यावर आणखी नियंत्रण आणत स्टॉक लिमिट कमी केली आहे. वाढत्या किमती आणि साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असून व्यापाऱ्यांचे लक्ष आता बाजारातील पुढील घडामोडींवर आहे.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील वखार महामंडाळाची गोदामे आधीच सोयाबीनने फुल झाली आहेत. त्यामुळे तूर कुठे साठवायची हा प्रश्न सरकारपुढे होता. त्यामुळेच राज्यात तुरीची खरेदी सुरु होण्यास उशीर झाला. पण आता वखार महामंडळाने राज्यातील खासगी गोदामे भाड्याने घेऊन तूर साठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

राज्यात यंदा सोयाबीनची खरेदी ६ फेब्रुवारीपर्यंत चालली. पण सोयाबीनची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने सरकारचे साठवणुकीचे नियोजन बिघडले होते. त्यामुळे तुरीची खरेदी कधी सुरु करायची आणि तूर खुठे साठवायची? हा प्रश्न होता. राज्यात वखार महामंडळाच्या गोदामांची एकूण साठवण क्षमता १८ लाख टन आहे.

Tur
Tur Market : तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

पण सोयाबीनचीच खरेदी ११ लाख २१ हजार टन झाली. सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानंतरही या गोदामांमध्ये सोयाबीन साठवण्यासाठी आठवडाभर खरेदी केंद्रांना वाट पाहावी लागली. खरेदी केंद्रांच्या गोदामांमध्येही सोयाबीन पडून होती. त्यामुळे तूर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला.

दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरु होणारी तूर खरेदी यंदा दोन आठवड्याने उशीरा सुरु झाली. त्याचे मुख्य कारण गोदामांची टंचाई हेच होते. पण तुरीचा बाजार कोसळल्याने सरकारला तूर खरेदी तातडीने सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे वखार महामंडळाने जिल्हानिहाय खासगे गोदामे भाड्याने घेतली.

Tur
Tur Procurement: तुरीची खरेदी ९० दिवस चालणार, खरेदीसाठी ३१५ केंद्रांना मंजुरी

या गोदामांमध्ये २ लाख ९७ हजार टन तूर साठवण्याचे नियोजन केल्याचे वखार महामंडळाचे म्हणणे आहे. तूर पट्ट्यात खेरदी जास्त होणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर विभागात खरेदी जास्त होणार आहे. पण सर्वच जिल्ह्यांमध्ये साठवणुकीचा प्रश्न निकाली निघाला असेही म्हणता येणार नाही. तूर खरेदी जशी वाढेल तसे साठवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले.

राज्य सरकारने १३ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला परवानगी दिली. राज्यात ३१५ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. पण खरेदीला अजून वेग आलेला नाही. मार्च महिन्यात तुरीच्या खेरदीला वेग येऊ शकतो. त्यावेळी साठवणुकीची समस्या आली नाही तर यंदा चांगली तूर खरेदी होऊ शकते, असेही काही केंद्र चालकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com