Market Bulletin: सोयाबीन दरात सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या दरात मागील दोन आठवड्यांपासून चांगली सुधारणा दिसून येत आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कामी झाली आहे. तर दुसरीकडे हमीभावाने खरेदीही वाढली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ५१०० ते ५२०० रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीन ४ हजार ६०० ते ५ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार पुन्हा सोयाबीनच्या दराला मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस दरात वाढकापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू झाल्यानंतर देशात कापसाचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे सीसीआयची खरेदीही सुरु आहे. याचा आधार दराला मिळत आहे. बाजारातील कापसाची आवकही सध्या कमी झाली आहे. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काही ठिकाणी उच्चांकी भाव ८ हजार १०० रुपयांवर देखील पोचला आहे. यापुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होणार आहे. त्यामुळे कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Wheat Sowing: गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा.मका भाव दबावातचराज्यातील बाजारात मक्याचे भाव दबावातच आहेत. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली आहे. तर दुसरीकडे मक्याला मिळणारा उठाव कमी आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. मक्याला सध्या बाजारात सरासरी १७०० ते २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. देशात खरिपातील मक्याचे उत्पादन १४ टक्क्यांनी वाढले आहे. रब्बी हंगामात लागवडीचा वेग काहीसा कमी झाला आहे. तरीही देखील पोषक हवामान असल्याने रब्बी हंगामातही मका उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याचे भाव यंदा हमीभावाच्या खालीच राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Crops New Variety: पंचवीस पिकांचे १८४ नवीन वाण प्रसारित.कांदा दरात चढ उतारराज्यातील बाजारात कांद्याच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारात लाला कांद्याची आवक सध्या चांगली सुरु आहे. रब्बी कांद्याची आवक कमी झाली आहे. तसेच रब्बीच्या कांद्याची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे बाजाराची मदार लाल कांद्यावरच आहे. लाल कांद्याच्या आवकेचा वेग कमी जास्त झाला तसे बाजारात बदल दिसून येत आहेत. सध्या कांदा सरासरी १३०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कांद्याच्या दरात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .टोमॅटोचे दर टिकूनबाजारात सध्या टोमॅटोची आवक सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. याचा आधार टोमॅटोच्या भावाला मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे. टोमॅटोला गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.