Market Bulletin: सोयाबीन स्थिरसोयाबीनच्या भावात मागील दोन दिवसांपासून स्थिरता आली आहे. सोयाबीनला बाजारात उठाव कायम आहे. सोयाबीनला सध्या सोयापेंडमुळे मागणी आहे. तर दुसरीकडे बाजारातील आवक कमी दिसून येत आहे. देशातील उत्पादन कमी झाल्यामुळे सध्या भावात तेजी दिसत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आजही प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसाला उठावदेशातील बाजारात कापसाचा उठाव कायम आहे. बाजार समित्यांमधील कापसाची आवक आणखी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात मात्र भावपातळी काहीशी स्थिरावलेली दिसत आहे. बाजारात कापूस आजही ८ हजार ५०० ते ९ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळातही बाजारातील कापसाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा बाजारावर परिणाम जाणवेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Watermelon Rate: खानदेशात कलिंगडाचे दर १२ ते १४ रुपयांवर स्थिर.टोमॅटो भावात सुधारणाराज्यातील बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढले आहेत. मागील काही आठवड्यांपासून बाजारातील आवक कमी होत आहे. राज्यभरातच नाही तर देशभरातील टोमॅटो पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला. पाणीटंचाईमुळे अनेक भागात तोटा कमी झाला आहे. याचा परिणाम बाजारावर जाणवत आहे. सध्या बाजारात टोमॅटो सरासरी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पुढील काही काळ पाणीटंचाई आणि उष्णता तसेच त्यानंतर पावसाचा टोमॅटो पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. टोमॅटोची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. याचा दराला आधार मिळेल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Soybean Production Improvement: आगामी हंगाम सोयाबीन उत्पादनात सुधारणेचा.लसूण टिकूनलसणाच्या भावात मागील काही आठवड्यांपासून स्थिरता दिसून येत आहे. बाजारातील लसणाची आवकही चांगली सुरु आहे. तर लसणाला उठावही आहे. काही बाजारांमध्ये लसणाच्या भावात काहीसे चढ उतार सोडले तर भावपातळी स्थिर आहे. सध्या लसणाला बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसणाचा भावही स्थिरावण्याची शक्यता असल्याचा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..आंबा आवक वाढलीराज्यातील बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. आंब्याला सध्या उठावही चांगला आहे. आंब्याला बाजारात सध्या वाणाप्रमाणे दर मिळत आहे. कापूसला सर्वाधिक १५ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर तोतापुरी आंबा सर्वात कमी दीड हजार ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. कलमी आंब्याला ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर लोकल आंबा वाणाप्रमाणे ७ हजारांपासून ते १३ हजारांपर्यंत विकला जात आहे. आंब्याचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकार शेतकरी व्यापारी व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.