Market Bulletin: सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. सोयाबीनला सध्या बाजारात चांगला उठाव मिळत आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी आहे. तर दुसरीकडे सोयातेल आणि सोयापेंडला मागणी आहे. यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. युध्दामुळे खाद्यतेल आयात महाग पडत आहे. यामुळे सोयातेलाचेही भाव वाढले आहेत. सोयाबीनचे दर आणखी काही दिवस स्थिर राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .कापूस स्थिरदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचा भाव स्थिर आहे. कापसाला चांगला उठावही आहे. निर्यातीसाठीही कापसाला मागणी येत आहे. कापसाची मागणी चांगली असल्याने मागील काही दिवसांपासून बाजार स्थिर आहे. सध्या बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव स्थिर ठेवला आहे. त्यामुळे कापसाचा भाव पुढील काळातही स्थिर राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: पपईच्या वाढतेय मागणी; सोयाबीनचे दर टिकून, कापसाला उठाव, डाळिंबाला मागणी तर मिरचीला उठाव टिकून .कारली आवक वाढलीराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कारल्याची आवक वाढत आहे. कारल्याला सध्या उठावही चांगला आहे. पण आवकेचा दबाव काहीसा वाढल्याने दरावर काहिसा परिणाम दिसून येत आहे. सध्या कारल्याला २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कारल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर नव्या लागडीला वाढती उष्णता आणि पाणीटंचाईचा फटका काही भागात बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारल्याला उठाव असल्याने पुढील काही दिवसांमध्ये दराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकार शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. .Global War Impact: युद्धामुळे जगभरातील शेतकऱ्यांची होरपळ.गवार तेजीतराज्यातली बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .टोमॅटो दबावातचराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून टोमटोचा भाव दबावात आहेत. बाजारातील आवक सध्या चांगली आहे. अनेक भागातील लागवडी वाढून सध्या तोडा चांगला निघत असल्याने बाजारात आवक वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवस टोमॅटोची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव दबावातच राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.