Market Bulletin: सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील २ दिवसांपासून स्थिरावले आहेत. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ३०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाही. सोयाबीनचा भाव स्थिर राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस दबावातसीसीआयने कापूस विक्रीचा भाव कमी केल्यामुळे कापसाचे भाव नरमले आहेत. सीसीआयने खंडीमागे ११०० रुपयांपर्यंत भाव कमी केले होते. यामुळे बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव १०० ते २०० रुपयांनी कमी झाला आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये आज कापूस सरासरी ७५०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला. तर कमाल भाव ८ हजार होता. देशातील बाजारात भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Unseasonal Rain: दोन दिवस वादळी पावसाचा अंदाज; अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान.टोमॅटो बाजारात चढ उतारटोमॅटोच्या भावात काही बाजारांमध्ये चढ उतार दिसून येत आहे. आवकेनुसार भावात २०० रुपयांपर्यंत बदल होत आहेत. पुणे, मुंबई, नारायणगाव आणि नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक असली तरी मागील दोन दिवसांमध्ये दरपातळी काहीशी स्थिरावली आहे. सध्या टोमॅटो या बाजारांमध्ये १४०० रुपयांपासून ते १८०० रुपयांपर्यंत सरासरी भावाने विकला जात आहे. तर कमाल भाव २ हजारांवर पोचला आहे. टोमॅटोला उठाव चांगला आहे. यामुळे टोमॅटोची भावपातळी काही दिवस यादरम्यान दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Maharashtra Weather: पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता.हळदीचा भाव टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव टिकून आहेत. बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा काहीशी कमीच आहे. पण हळदीला चांगलाच उठाव आहे. यामुळे दरपातळी टिकून आहे. हळदीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १४ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दरही टिकून राहू शकतात, अशा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कारले टिकूनराज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे. तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसत आहे. त्यामुळे भावपातळीही बहुतांशी बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात ४ हजार ५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्यचे भाव या भावपातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.