Agrowon Podcast : तुरीतील तेजी कायम ; कापूस, सोयाबीन, मका, आणि काय आहेत कांदा दर?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, काकडी, आले आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market Update Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १२.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३७३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ६५० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

कापसाच्या वायद्यांमध्येही चढ उतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी ७६.६२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५६ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र टिकून आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील कापसाची भावपातळी स्थिर दिसते. कापसाचे भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याचा अंदाज आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११  हजारांच्या दरम्यान आला. तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Agrowon Podcast : गव्हाचे भाव टिकून ; कापूस, सोयाबीन, मका, तसेच कांद्याचे काय दर आहेत?

आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला. सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

काकडीला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते. सध्या बाजारातील आवक आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही मागणी आहे. सध्या काकडीला राज्यभरात प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर चांगले राहू शकतात, असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com