Market Bulletin: सोयाबीन टिकूनसोयाबीनच्या भावात दोन दिवस सुधारणा झाल्यानंतर भाव आज काहीसे स्थिरावले होते. सोयाबीनची बाजारातील उपलब्धता कमी झालेली आहे. तर आयातीविषयी सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्योगांना गरज भागविण्यासाठी भाव वाढवून सोयाबीनची खरेदी करावी लागत आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमधील सोयाबीनचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजारांच्या दरम्यान पोचला आहे. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस आवक कमीचदेशातील बाजारात कापसाची आवक मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. तर कापसाला चांगला उठाव आहे. याचा आधार कापसाच्या भावाला आहे. पण सीसीआय भाव कमी करून कापसाची विक्री करत असल्याचा दबाव बाजारावर आहे. बाजारात ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान कापसाला भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव ७६ सेंटवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव स्थिर आहे. देशात मात्र भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाचा बाजार पुढील काळात स्थिरावू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस स्थिरावला, कांदा दर टिकून, कोथिंबीर सुधारली तर गवारची आवक कमीच.कोथिंबीरला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक कमी झालेली आहे. कोथिंबीर पिकाला वाढलेली उष्णता आणि पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तर दुसरीकडे कोथिंबीरला उठाव चांगला मिळत आहे. यामुळे कोथिंबरच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारात कोथिंबीरला प्रतिशेकडा १५०० ते १७०० रुपये भाव मिळत आहे. तर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजारांपर्यंत वेगवेगळ्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे कोथिंबीरला भाव मिळत आहे. पुढील काळात कोथिंबीरची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथिंबीरचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज कोथिंबर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Ethanol Blended Petrol: बावीस ते तीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलला करमुक्ती.काकडी दरात वाढराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून काकडीची आवक कमी झालेली आहे. तर काकडीला उन्हामुळे मागणी कायम आहे. यामुळे दरात सुधारणा झाली आहे. बाजारात सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. काकडी पिकाला मागील दोन महिन्यात उष्णतेचा फटका बसला. तसेच अनेक भागात पाणीटंचाई जाणवत होती. याचा काकडीच्या उत्पादनावर परिणाम दिसत आहे. पुढील काळात काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..लिंबू स्थिरराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाचा भाव स्थिरावला आहे. बाजारातील लिंबाची आवक कमी असूनही भाव स्थिरावलेले आहेत. वाढलेली उष्णता आणि उकाड्यामुळे लिंबाला सध्याही मागणी चांगली आहे. असे असले तरी लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. उष्णतेचा आणि वादळी पावसाचा लिंबू पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.