Agrowon Podcast: सोयाबीन भाव मंदीतच; मिरची-केळी तेजीत, लसणाला उठाव, बटाटा स्थिर

Daily Commodity Rates: आज आपण हिरवी मिरची, लसूण, बटाटा, केळी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market Products
Agriculture Market ProductsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

हिरवी मिरची तेजीत

पाऊस सुरु झाल्यापासून राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक दिवसागणिक कमी होत आहे. परंतु दिसरीकडे मिरचीला चांगला उठाव आह. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आली आहे. सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार आहे. तर हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

लसणाला उठाव

लसणाचे भाव राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. बाजारातील लसणाची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे लसणाला चांगला उठावही मिळत आहे. त्यामुळे दरपातळी टिकून आहे. लसणाला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे. गुवत्तापूर्ण लसूण यापेक्षाही जास्त दरात विकला जात आहे. लसणाची आवक बाजारात पुढील काही आठवडे मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसणाचे दरही टकून राहू शकतात, असा अंदाज लासूण बाजारातील जाणकार शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market Products
Edible Oil Hording : खाद्यतेलाची साठेबाजी रोखण्यासाठी आणणार नवा कायदा

बटाट्याचे दर टिकून

देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झाले. देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे. परिणामी बटाट्याचे दर दबावातच आहेत. बटाट्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

Agriculture Market Products
Cotton Stock India : कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८४ टक्के अधिक

केळीचे दर तेजीत

दर्जेदार केळीला सध्या चांगली मागणी आहे. केळी आवकेत  सतत घट झाली आहे. त्यामुळे २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. मागील वर्षी जुलैच्या सुरुवातीला केळीचे कमाल दर १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल होते. या तुलनेत यंदा जुलैतच चांगली दरवाढ झाली आहे. केळीचे दर काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन मंदीतच

देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मंदीतच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे सोयाबीन आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा दिसून आली. मात्र, त्याचा आधार देशातील सोयाबीन दराला मिळाला नाही. देशात सोयापेंडचे पडलेले दर आणि डीडीजीएसचा पुरेसा साठा यामुळे सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. नाफेड आणि एनसीसीएफची सोयाबीन विक्री देखील याच दरम्यान सुरु आहे. देशात सोयाबीनचा पुरवठा पुरेसा आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com