Market Bulletin: कापूस दर टिकूनदेशातील बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. बाजारातील कापसाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला मिळत आहे. पाॅलिस्टरचे भावही वाढले आहेत. तर शेजारच्या देशांमध्ये कापसाची आणि सुताची निर्यात वाढत आहे. यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये दर मिळत आहे. तर काही बाजारात कापसाचा भाव ८ हजार ४०० रुपयांच्या पुढे सरकले आहेत. कापसाचा भाव पुढील काही दिवस कापसाचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. .सोयाबीन सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर सोयाबीनला चांंगला उठाव आहे. तेलासाठी सोयाबीनचे गाळप वाढत आहे. तेलाचे भावही वाढले आहेत. केवळ सोयातेलच नाही तर पामतेल, सूर्यफुल तेल आणि सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनला उठाव असल्याने भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Export Crisis: माल वाहतूक महागली.भेंडीची आवक स्थिरराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून भेंडीची आवक काहिशी सुधारलेली आहे. तर भेंडीचा उठाव स्थिर आहे. यामुळे दर स्थिरावण्यास मदत झाली आहे. भेंडीला सध्या गुणवत्तेनुसार सरासरी २५०० ते ४ हजारांच्या दरम्यान आहेत. पुढील काही दिवस भेंडीची बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणीटंचाईमुळे अनेक भागात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी आवकेवर परिणाम होऊन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..Petrol Diesel Supply Normal: जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द.कैरीला वाढती मागणीराज्यातील बाजारात सध्या कैरीची आवक काहिशी सुधारली आहे. पण दुसरीकडे कैरीला उठावही चांगला आहे. वाढत्या उन्हामुळेही कैरीला मागणी येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या कैरीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळत आहे. कैरीची बाजारातील आवक पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कैरीच्या भावावर दबाव येऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..टोमॅटो आवक टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून टोमटोचा भाव दबावात आहेत. बाजारातील आवक सध्या चांगली आहे. अनेक भागातील लागवडी वाढून सध्या तोडा चांगला निघत असल्याने बाजारात आवक वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काही दिवस टोमॅटोची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव दबावातच राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.