Agrowon Podcast : हळदीत काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच तूर दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७२.७८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : कापूस वायदे दबावातच; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत लसूण दर ?

कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. पावसामुळे बाजारातील आवक आणि मागणीवरही काही प्रमाणात परिणाम दिसत आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील घटलेले उत्पादन, निर्यातबंदी, आणि कमी झालेला स्टाॅक या घटकांचा कांदा बाजारावर परिणाम दिसत आहे. यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Market
Milk Powder Import : दूध भुकटी आयातीसाठी कोणाचाही अर्ज नाही

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार दिसून आले. सरकारने स्टाॅक लिमिट कायम ठेवल्याचा काहीसा परिणामही दिसून आला. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार दिसून येत आहे. यंदा उत्पादन घटले तरी वाढलेल्या दरामुळे निर्यात काहीशी कमी आहे. तर लागवडही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून काहीशी नरमाई दिसून आली. सध्या हळदीला सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com