Agrowon Podcast : बाजारात गव्हाच्या दरात काहीशी सुधारणा

Wheat Rate : सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसत आहेत.
Wheat Rate
Wheat RateAgrowon
Published on
Updated on

१) सोयाबीन बाजार स्थिरावला (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे काहीसे स्थिरावले. मात्र सोयापेंडच्या वायद्यांमधील घट आजही कायम होती. सोयाबीनचे वायदे आज १४.१५ सेंट प्रतिबुशेल्सरवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४२२ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील सोयाबीन बाजारही स्थिरावला आहे. आज सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय. सोयाबीन भाव काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यसकांनी व्यक्त केला.

२) कापसाचे भाव कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर स्थिर दिसतन नाहीत. मात्र आज दरातील नरमाई थांबलेली दिसली. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपयांचा दर मिळतोय.

बाजारातील आवक मात्र कायम दिसते. आवकेचा दबाव असल्यानचं दर कमी आहेत, असं सांगातलं जातं. पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होण्याचा अंदाज आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) मुगाच्या दरात तेजी (Moong Rate)

देशातील बाजारात सध्या मुगाचे भाव तेजीत आहेत. यंदा मुगाचे उत्पादन घटले. तुरीचे आणि उडदाचेही दर तेजीत आहेत. याचा फायदा मुगालाही मिळतोय. सध्या मुगाला ७ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मुगाला चांगला भाव मिळत असल्यानं उन्हाळी हंगामात मूग लागवडीला जास्त पसंती मिळत आहे.

पण सध्या देशात मुगाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळं उन्हाळी हंगामातील उत्पादन वाढलं तरी मुगाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज मूग बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Wheat Rate
Maize Growers Loot : बाजार समित्यांत मका उत्पादकांची कटतीतून लूट

४) मक्याचे भाव दबावात (Maize Rate)

देशातील महत्वाच्या मका भागात बाजारातील आवक वाढत आहे. पण पावसामुळं शेतकरी काढणी झाल्यानंतर लगेच बाजारात विक्री करत आहेत. त्यामुळं अशा मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. जास्त ओलावा असलेला मका १५०० रुपयांपासून विकला जातोय.

तर एफएक्यू दर्जाच्या मक्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १९०० ते २१०० रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक अधिक असलेल्या काळात मक्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

५) खुल्या बाजारात गव्हाला काय भाव मिळतोय? (Wheat market)

सरकारची गहू खरेदी यंदा वेगाने सुरु आहे. पण खुल्या बाजारात सध्या गव्हाचे भाव हळूहळू सुधारताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर गव्हाच्या दरानं हमीभावाचाही टप्पा पार केला. त्यामुळं गहू उत्पादनात महत्वाच्या उत्तर प्रदेशात शेतकरी खुल्या बाजारातील विक्रीला पसंती देत असल्याचं दिसतं.

उत्तर प्रदेश आणि इतर काही ठिकाणी सरकारच्या हमीभाव खरेदीला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरीही सरकारनं आतापर्यंत जवळपास २३२ लाख टन गहू खरेदी केली. गेल्या संपूर्ण हंगामात सरकारला केवळ १८८ लाख टन गहू खरेदी करता आला होता. यापैकी सर्वाधिक खरेदी पंजाबमधून करण्यात आली.

Wheat Rate
Maize Growers Loot : बाजार समित्यांत मका उत्पादकांची कटतीतून लूट

गेल्या महिनाभरात महत्वाच्या गहू उत्पादक भागांमध्ये पाऊस झाला. याचा गहू पिकाला फटका बसला. नुकसान तर झालच शिवाय गव्हाची गुणवत्ताही कमी झाली. त्यामुळं खुल्या बाजारातही गव्हाचे भाव १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपयांपर्यंत पोचले. शिवाय एफसीआयला गहू दिल्यास पेमेंट मिळण्यास उशीर होतो.

खुल्या बाजारात विक्री केल्यास पेमेंट लगेच मिळते. त्यामुळं अनेक भागातील शेतकरी खुल्या बाजारात विक्री करत आहेत. तर सरकारचंही ३४१ लाख टन खरेदीचं उद्दीष्ट पूर्ण होऊ शकतं. पण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर गव्हाच्या दरात आणखी सुधारणा दिसू शकतं, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com