Maize Growers Loot : बाजार समित्यांत मका उत्पादकांची कटतीतून लूट

खानदेशातील प्रशासन थंड; कारवाई होईना
Maize
Maize Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात जळगावसह चोपडा, अमळनेर, धुळे, शहादा या बाजार समित्यांमध्ये मका उत्पादकांची एक क्विंटलमागे तीन ते चार किलो वजन कमी करून, अर्थात चार किलोंची कटती लावून सर्रास लूट केली जात आहे.

ही लूट मागील वर्षातही करण्यात आली. खासगी खरेदीदारदेखील कटती लावून लूट करीत आहेत. मका (Maize) ज्या बारदान्यात भरला जातो, त्याचे वजन कमी करतो, असे खरेदीदार किंवा व्यापारी, अडतदार कटतीसंबंधी सांगत आहेत.

परंतु बारदान्याचे वजन अर्धा किलोपेक्षा अधिक नसते. असे असताना क्विंटलमागे तीन ते चार किलो कटती का केली जाते, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Maize
Maize Market : रब्बी मक्याची आवक येताच दरात नरमाई; मका बाजार उभारी घेईल का?

जळगाव बाजार समितीमध्ये हा प्रकार वेगात सुरू आहे. खेडा खरेदीतही हा प्रकार अनेक खरेदीदार, अडतदार करीत आहेत.

बाजार समितीबाहेरील व्यवहारावर कुठलेही नियंत्रण बाजार समिती आणत नसल्याचे दिसत आहे. आपल्या मर्जीतील खरेदीदार, अडतदारांना कुठलेही हुकूम, नियमावली लावण्याची मुभाच जणू जळगाव, चोपडा, अमळनेरच्या बाजार समित्यांनी दिल्याची स्थिती आहे.

Maize
Chana Market : हरभरा उत्पादकांची होतेय लूट

नैसर्गिक समस्या आ वासून
मक्याचे दर दिवसागणिक कमी होत आहेत. दर २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवरून १८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत.

त्यात वादळ, पावसाने मोठा फटका बसला. नैसर्गिक समस्या आ वासून उभ्या असतानाच कटतीचा प्रकार शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे.

प्रशासन कारवाईची हिंमत करेना
जळगाव बाजार समितीने यासंबंधी मागील चार ते पाच वर्षांत एकाही अडतदार, खरेदीदारावर कारवाई केलेली नाही. उपनिबंधक, सहायक निबंधक फक्त लेखी तक्रारीची प्रतीक्षा करतात व नियमांची बतावणी करून मोकळे होतात. पण कारवाई झालेली नाही.

जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळे, शहादा या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात रोज पाच ते सहा हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. यात कटतीतून हजारो रुपयांची लूट होत आहे, अशी माहिती एका शेतकऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com