Agrowon Podcast : कांद्यात काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत गहू दर ?

Market Commodity Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, कांदा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन टिकून

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव आजही ९.५० डाॅलरच्या वर राहीला. बाजार सुरु झाल्यापासूनच दरात काहीसे चढ उतार सुरु होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा ९.५९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयातेलाचा बाजार ३९.६९ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३०६ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस भावात चढ उतार

कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस निचांकी पातळीच्या दरम्यान कायम आहे. तर देशातही भावाने मान टाकलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाला सरासरी ७०.२४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५८ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, केळी तसेच काय आहेत तूरीचे दर

कांद्यात काहीशी सुधारणा

कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. घटलेल्या दरात मागणी वाढल्यानंतर बाजारातील आवक कमी होत आहे. तर दरात वाढ झाल्यानंतर मागणी कमी होऊन दरात काहीशी नरमाई दिसत आहे. हे समिकरण गेल्या तीन आठवड्यांपासून दिसत आहे. दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा अनेक बाजारांमध्ये झाली. सध्या कांद्याला सरासरी २८०० ते ३ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील हे चढ उतार आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Soybean Cotton Anudan : अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द ? कापूस सोयाबीन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

गव्हाचा स्थिर

केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टाॅक लिमिट, बाजारात गव्हाची आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला. परिणामी गव्हाचे भाव उच्चांकावरून कमी होऊन स्थिरावले आहेत. आजही गव्हाला बाजारात सरासरी २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे. दुसरीकडे निर्यातबंदी कायम आहे. त्यामुळे बाजारावर दबाव. सरकारच्या धोरणांमुळे गव्हाचा बाजार आणखी काही महीने कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्याच्या भावात तेजी

हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com