Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत मका दर?

Commodity Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज सुधारणा दिसून आली. सोयाबीनचा भाव गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर पोचला. वाढलेली मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.०३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंड काहीसे कमी होऊन ३१५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये काल सुधारणा झाल्यानंतर आज काहिशी नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७२.४५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे वाढले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५७ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Cotton Production : कापूस उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी घटणार

कांदा दरात सुधारणा

कांद्याच्या भावात मागील ३ दिवसांमध्ये पुन्हा काहिशी सुधारणा दिसून आली. देशात सध्या रब्बी कांद्याची उपलब्धता खूपच कमी आहे. तसेच खरिपातील कांद्याची बाजारातील आवकही कमी आहे. तर दुसरीकडे दिवाळी सणामुळे कांद्याला चांगला उठाव येत आहे. मात्र बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या भावाला आधार मिळाला. कांद्याचा भाव आज ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast : टोमॅटोचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

मक्याचा बाजार स्थिर

खरिपातील मक्याची आवक सुरु झाल्यानंतर मक्याच्या भावात नरमाई आली होती. पण मागील दोन आठवड्यांपासून मक्याचा बाजारभाव काहिसा स्थिरावला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या बाजारभावात तफावत दिसून येत आहे. राज्यातील बाजारात मक्याला गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचा बाजार यंदा टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

लसूण तेजीतच

बाजारात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारात लसणाची आवक खपूच कमी आहे. तसेच नवा माल बाजारात खूपच कमी प्रमाणात येत आहे. लसणाची आवक वाढण्याला आणखी उशीर आहे. पण दुसरीकडे सणामुळे लसणाला चांगला उठाव आहे. यामुळे लसणाला चांगला भाव मिळत आहे. बाजारात सध्या लसूण २० हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढच्या काही आठवड्यांमध्ये लसणाची आवक काहीशी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com