Market Bulletin: सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव मागील ४ दिवसांपासून काहीसा स्थिरावला आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ८०० ते ५ हजा र ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या भावाला चांगला आधार आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात चढ उतारदेशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सरकीचे भाव टिकून आहेत. सरकीच्या भावात काही बाजारांमध्ये १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. सरकीचे भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मात्र सीसीआय कापसाची विक्री करत आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव आहे. कापसाचा भाव ७ हजार ७०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात कापसाला उठाव आहे. मात्र सीसीआय़च्या विक्रीचा दरावर दबाव असल्याचे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. .Sugar Sale Quota: फेब्रुवारीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा.केळीचे दर टिकून राज्यातील बाजारात केळीची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसत आहे. तर केळीला थंडीमुळे उठाव मिळत आहे. यामुळे केळीच्या भावाला आधार मिळत आहे. केळीची अनेक भागात सध्या उलब्धता मर्यादीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे. त्यामुळे केळीला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीची आवक पुढील काही दिवस स्थिर राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला आहे. .Grape Price: द्राक्षांना यंदा विक्रमी दर.गवार तेजीतचबाजारातील गवारची आवक मर्यादीत आहे. राज्यातील अनेक भागांत गवारची उपलब्धता कमीच आहे. तसेच गवारची अनेक भागातील लागवडही कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे गवारची बाजारातील आवक कमी आहे. तर गवारला उठाव चांगला आहे. सध्या गवार सरासरी ६ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. गवारची आवक पुढील काळातही मर्यादीत राहू शकते. त्यामुळे गवारचे दर टिकून राहतील, असा अंदाज गवार बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. .शेवगा दरात नरमाई शेवगा भावाने यंदा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र काही दिवसांपासून बाजारातील शेवग्याची आवक सुधारली आहे. याचा दबाव दरावर आला आहे. शेवग्याचे भाव आता नरमले आहेत. बाजारातील आवकही चांगली सुरु आहे. काही बाजारांमध्ये शेवग्याला कमाल १५ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ६ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. शेवग्याची आवक वाढली तरी आवकेचा दबाव कमीच आहे. शेवग्याच्या आवकेत पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज शेवगा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.