Market Bulletin: सोयाबीन दरात नरमाईभारत-अमेरिकेतील व्यापार कराराच्या चर्चेचा परिणाम सोयाबीन बाजारावर पाहायला मिळत आहे. राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन दर नरमले आहेत. प्रक्रिया प्लॉंटसने सोयाबीन खरेदी दर कमी केले आहेत. प्लॉंटसने ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान खरेदीचे व्यवहार केले आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीनचे २०० ते ३०० रुपयांनी नरमले आहेत. राज्यातील बाजारात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपयांचा दर मिळत आहे. तर काही बाजारात आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. पुढील काळात सोयाबीन दरात चढ-उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. .कापूस बाजार दबावातराज्यातील कापूस बाजारात आवक कमी आहे. परंतु सीसीआयच्या कापूस विक्रीचा बाजारावर दबाव आहे. राज्यातील बाजारात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ७ हजार ९०० रुपयांचा दर मिळत आहे. तर प्रमुख बाजारात आवक कमीच आहे. परंतु सीसीआयने कापूस विक्री सुरु केली आहे. तर लांब धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क हटवण्यात आलं आहे. तसेच रुईचे दरही नरमले आहेत. त्यामुळे राज्यातील कापूस बाजारावर काहीसा दबाव पहायला मिळत आहे. कापसाला आज दुपारपर्यंत देऊळगाव बाजारात ७ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला. पुढील काळात कापूस आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. परंतु सीसीआयच्या विक्रीमुळे कापूस दरात चढ-उतार राहतील, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे..Rain Update: उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अंशत ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ.गुलाब दर टिकूनराज्यातील बाजारात गुलाबाची आवक काहीशी वाढली आहे. परंतु व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईमुळे गुलाबाला उठाव आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. गुलाब उत्पादक पट्ट्यात हवामान बदलाचा मोठा फटका बसला. तसेच कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, असे शेतकरी सांगतात.राज्यातील प्रमुख बाजारात गुलाबाला प्रति नग ३० ते ४० रुपयांचा दर मिळत आहे. तर ७ ते ८ क्विंटलची आवक होत आहे. व्हेलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर उठाव टिकून राहील. तर दरात काहीशी वाढ पाहायला मिळू शकते. तसेच लग्नसराईमुळे पुढील काळात गुलाबाच्या दराला मागणीचा आधार राहील, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत..Maharashtra Weather: राज्याच्या किमान तापमानात घट शक्य.गाजरात नरमाईगाजराची आवक सुधारली आहे. त्यामुळे गाजराच्या भावात नरमाई आली आहे. सध्या राज्यातील बाजारात गाजाराची सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विक्री होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांनी गाजराचे दर नरमले आहेत. तर उच्च गुणवत्तेच्या गाजराला चांगला दर मिळत आहे. परंतु त्याची आवक कमी आहे. राज्यातील ढगाळ हवामानाचा गाजर पिकावर परिणाम झाला. पुढील काळात गाजराच्या आवक कमी होण्याची शक्यता असून आणखी दिवस दरात नरमाई राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत..गवार तेजीतराज्यातील प्रमुख बाजारात गवारची आवक कमी आहे. तर उठाव चांगला आहे. गवारची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे गवारचे दर तेजीत आहेत.राज्यातील बाजारात गवारची आवक १०० क्विंटलच्या आतच आहे. राज्यातील बाजारात गवारला प्रतिक्विंटल ७ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळत आहे. तर उच्च गुणवत्तेच्या गवारला काही बाजारात १२ ते १३ हजार रुपयांचा दर मिळत आहे. उच्च गुणवत्तेच्या गवारची आवक मात्र कमी आहे. पुढील दोन आठवडे गवार दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज शेतकरी, व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.