Agrowon Podcast : लाल मिरचीचे भाव दबावात

Red Chili Rate : देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता.
Red Chili
Red Chili RateAgrowon
Published on
Updated on

लाल मिरची दबावात

देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता. बहुतांशी बाजारात मिरची १८ हजार ते २० हजाराने विकली जात होती. पण त्यानंतरही मिरचीचे भाव कमी होत गेले.

देशातील उत्पादन वाढल्याने दरावर दबाव वाढत गेला सध्या देशातील बहुतांशी बाजारात मिरची १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीचे भाव पडल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लसणाचे भाव नरमले

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत.

लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी १३ हजार ते १६ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Red Chili
Chana Import: हरभरा आयात आणि उत्पादन वाढणार; भाव काही काळ हमीभावाच्या खाली राहणार

हरभरा दर टिकून

हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली. हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एन्ट्री झाली. आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर १५ दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. त्यावेळी हरभरा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात. पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारालाही आधार असेल, असे अभ्यासकांनी सांगितले.

Red Chili
Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची अपेक्षा

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १०.४१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०१ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले होते.

देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३३० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

कापसाचा बाजारभाव कमीच आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी सीसीआयला जास्त कापूस देत आहेत. त्यामुळे सीसीआयची खरेदी वाढत आहे. तर खुल्या बाजारात सध्या कापूस ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांनी विकला जात आहे. कापसाची बाजारातील आवक कमी होणार असली तरी सरासरीएवढी राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चनंतर आवकेत घट होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com