Market Bulletin: हिरवी मिरची काहिशी नरमलीराज्यातील बाजारात मागील दोन दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक काहीशी सुधारली आहे. त्याचा परिणाम दराव दिसून आला. सप्टेंबर महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका मिरची पिकाला बसला होता. त्यामुळे बाजारातील मिरचीची आवक कमी होती. याचा आधार दराला होता. पण आता दर बहुतांशी बाजारात २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. हिरव्या मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला. .बाजरीचे दर दबावातचदेशातील बाजारात बाजरीचे दर मागील दोन महिन्यांपासून दबावातच दिसत आहेत. मागील वर्षभर देशातील बाजरीचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे बाजारातील बाजारीची आवक चांगली होती. याचा दबाव दरावर राहीला. आजही देशातील बाजारात बाजरी प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. खरिपातील बाजाराचीही देशातील बाजारात आवक होत आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारीची आवक वाढण्याची शक्यता आहे. याचाही दबाव बाजरीच्या दरावर राहील..Agrowon Podcast: कांदा दर दबावातच, उडदाचे भाव कमी, केळीचे दर स्थिर, कारलीला उठाव तर गवार तेजीतच.बटाट्याचे दर स्थिरबटाट्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे इतर भाजीपाल्याचे दर वाढले होते. त्यामुळे बटाट्याला चांगली मागणी आली होती. तसेच नवरात्रीच्या उपसामुळेही मागणी होती. त्यामुळे बटाट्याचे दर सरासरी १३०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील बटाटा लागवडींना काही प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे. याचा परिणाम बटाटा उत्पादनावर होऊ शकतो. तसेच पुढील काळात बटाट्याला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. याचा दरावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला..Tomato Market: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची उच्चांकी आवक.पेरुचे दर टिकूनराज्यातील बाजारात गुणवत्तापूर्ण पेरुची आवक कमी आहे. पावसाचा राज्यातील पेरू बागांना मोठा तडाखा बसला. सततत्या पावसाने पेरूवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. तसेच फळगळही मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या बाजारात पेरुला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार दर मिळत आहे. तर गुणवत्तापूर्ण पेरुला सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. गुणवत्तापूर्ण पेरुची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरुचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला..बीटची आवक कमीचराज्यातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून बीटची आवक कमीच आहे. यंदा पावसामुळे अनेक भागात लागवडी कमीच झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक ठिकाणी बीटच्या प्लाॅटचे पावसानेही नुकसान झाले. त्यामुळे मागील आवक कमी आहे. तर दुसरीकडे बीटला उठाव मात्र चांगला आहे. त्यामुळे सध्या बीटला १७०० ते २ हजारांचा दर मिळत आहे. बीटची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकते. तर मागणी मात्र चांगली राहू शकते. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.