Market Bulletin: सोयाबीनचे दर टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनच्या भाव टिकून आहेत. प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदीच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. युध्दामुळे आयात सोयातेलाचे भाव वाढले आहेत. तर सोयापेंडलाही उठाव आहे. यामुळे सोयाबीनला मागणी आहे. सोयाबीनला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाला उठावदेशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव आहे. युध्दामुळे जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे चीन, बांगलादेशसह शेजारच्या काही देशांकडून भारताच्या कापसाला उठाव मिळत आहे. याचा कापूस दराला आधार मिळत आहे. सध्या देशात कापसाची विक्री ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान होत आहे. सीसीआनेही कापूस विक्रीचे भाव वाढवले आहेत. युध्दाचा परिणाम असेपर्यंत कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Global War Impact: युद्धामुळे जगभरातील शेतकऱ्यांची होरपळ.डाळिंबाला मागणी राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासत आहे. याचा आधार दराला मिळत आहे. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारले आहेत. सध्या डाळिंब बाजारात ८ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Ethanol Supply: तेल कंपन्यांना चार महिन्यांत ३२७ कोटी लिटर इथेनॉल .पपईचा भाव स्थिरराज्यातील बाजारात पपईला चांगलाच उठाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे पपईला मागणी वाढत आहे. तर बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. वाढत्या उन्हासोबत मागणी वाढत असल्याने सध्या पपईला प्रतिक्विंटल सराकरी १६०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच बदलत्या वातावरणाचा पपई पिकालाही फटका बसत आहे. पुढील काळातही पपईची बाजारातील आवक काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .मिरचीला उठाव टिकून राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.