Market Bulletin: कापूस दरात सुधारणाकापसाच्या भावात कालपासून काहिशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या बाजारातील कापसाची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे. तेलाचे भाव वाढल्याने मानवनिर्मित कापडाचेही भाव सुधारले आहेत. याचा आधार कापसाच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात कापूस सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार हजारांच्या दरम्यान आहेत. तर कमाल भाव ८ हजार ३०० रुपयांवर पोचले आहेत. कापसाचा भाव काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .काकडीचा भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून काकडीचा भाव टिकून आहे. बाजारातील काकडीची आवक सध्या मर्यादीत दिसत आहे. तर काकडीला उठाव चांगला आहे. याचा आधार दरालाही मिळत आहे. सध्या काकडीचा भाव प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे. वाढत्या उन्हासोबत काकडीला उठाव मिळत आहे. तर काकडी पिकाला वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यामुळे काकडीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज काकडी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agri Online Market: हळद, गूळ, बेदाणा आता ‘ऑनलाइन’ बाजारात.गवार तेजीतराज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव.पपईला मागणीराज्यातील बाजारात पपईला चांगलाच उठाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे पपईला मागणी वाढत आहे. तर बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. वाढत्या उन्हासोबत मागणी वाढत असल्याने सध्या पपईला प्रतिक्विंटल सराकरी १६०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच बदलत्या वातावरणाचा पपई पिकालाही फटका बसत आहे. पुढील काळातही पपईची बाजारातील आवक काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..मिरचीचे भाव टिकूनराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.