Market Bulletin: सोयाबीन आजही स्थिरगेल्या दोन आठवड्यातील चढ उतारानंतर चालू आठवड्यात सोयाबीनचा भाव काहीसा स्थिरावला आहे. सोमवारपासून सोयाबीनचा भाव एका पातळीच्या दरम्यान दिसत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केले. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार विकले गेले. सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु झाल्यामुळे बाजारातील आवकही कमी जास्त होत आहे. बाजारातील विविध चर्चांमुळे सध्या बाजारात अस्थिरता दिसत आहे. पुढील काही दिवस सोयाबीन भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात चढ उतारदेशातील बाजारात कापसाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सरकारने आयातीवरील शुल्क काढल्यानंतर मिल्सकडून स्थानिक बाजारात उठाव कमी दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. रुईच्या भावात काहीसे चढ उतार होत असले तरी सरकीचे भाव टिकून आहे. सरकी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरातील स्थिरता आणि देशातील कमी आवक यामुळे पुढील काळात कापूस दर स्थिरावू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर.केळीला उठावराज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून केळीची आवक कमी झाली आहे. तर केळीला चांगला उठाव आहे. मागील काही महिन्यांमध्ये केळी पिकाला राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका बसला आहे. यामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात केळीला प्रतिक्विंटल सरासरी १४०० ते २ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर केळीला उठाव चांगला राहील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Global Cotton Production: जागतिक कापूस उत्पादन घटणार.कांद्यात काहीशी सुधारणाकांद्याच्या भावात दोन दिवसांममध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. कांद्याची आवक अनेक बाजारांमध्ये कमी झाल्याचे दिसत आहे. तसेच कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे भावाला आधार दिसत आहे. कांद्याचा सरासरी भाव ११०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. तरीही बाजारातील बहुतांशी कांद्याची विक्री उत्पादन खर्चापेक्षा कमी भावातच होत आहे. यापुढील काळात बाजारातील कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नाफेडची खरेदी बाजारात सुरु झाल्यानंतर याचाही आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .तूर दबावातचदेशातील बाजारात हरभरा आणि इतर कडधान्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. मात्र तुरीचा बाव दबावात आहे. तुरीला बाजारात आजही हमीभावाच्या खालीच भाव मिळत आहे. तुरीची बाजारातील आवकही कमीच आहे. उत्पादनही घटलेले आहे. तरीही भावावर दबाव कायम आहे. आज बाजारात तूर प्रतिक्विंट सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काळात देशातील तुरीची लागवड आणि बाजारातील आवकेतील चढ उताराचा दरावरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.