Market Bulletin: कांद्यात काहिशी सुधारणाराज्यातील अनेक बाजारात आज काहिशी सुधारणा दिसून आली. नाफेडने कांदा खरेदीच्या भावात ७० रुपयांची वाढ केली आहे. याचाच आधार बाजाराला मिळताना दिसत आहे. तसेच कांद्याच्या भावात सुधारणा होताना बाजारातील आवकही कमी होताना दिसत आहे. नाफेडचा कांदा खरेदीचा भाव १६५० रुपयांवर पोचला आहे. तर बाजार समित्यांमध्ये सरासरी भावपातळी १३०० ते १६०० रुपये झाली आहे. चांगल्या गुवणत्तेचा कांदा १७०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नाफेडचा खरेदीचा दरही वाढण्याची शक्यता आहे. याचा आधार कांदा दराला मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन स्थिरावलेदेशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज स्थिरावला होता. गेल्या आठवडाभरात सोयाबीनच्या भावात चढ उतार पाहायला मिळाले. पण गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यातील भावपातळी अधिक होती. काहीसे चढ उतार दिसले तरी भावात आठवड्याच्या शेवटी दर वाढलेल्या पातळीवर टिकून आहेत. देशातील बाजारातील आवक मात्र कमी झालेली आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजारांच्या दरम्यान विकले गेले. पुढील काळात बाजारातील सोयाबीनची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार सोयाबीनच्या भावाला राहील, असाही अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यसकांनी व्यक्त केला आहे. .Horticulture Production: फलोत्पादनाचा उच्चांक.गाजराला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून गाजराच्या भावात वाढ दिसून आली आहे. बाजारातील गाजराची आवक कमी होत आहे. गाजर पिकाला उष्णतेचा आणि कमी पाण्याचा फटका बसत आहे. अनेक भागातील गाजराचे प्लाॅट कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा आधार गाजराच्या भावाला मिळत आहे. सध्या बाजारात गाजर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. अनेक बाजारातील आवक कमी झालेली आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तर काही भागातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार गाजराच्या भावाला मिळेल, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन भाव टिकून; कापूस आवक कमीच, कोथिंबीरला उठाव, काकडी दरात वाढ तर लिंबू स्थिर.जांभूळ दर टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून जांभळाची आवक वाढलेली आहे. तर दुसरीकडे जांभळाला उठावही मिळत आहे. राज्यातील बाजारांमधील दरपातळीही कमी अधिक दिसत आहे. पुणे आणि मुंबई बाजारात जांभळाला चांगला दर मिळत आहे. पुणे बाजारात सरासरी ७ हजार ते १० हजाराने जांभूळ विकले जात आहे. तर मुंबई बाजारात सर्वाधिक २५ हजारांपर्यंत दर मिळत आहे. राज्यातील बाजारात बाजारांमध्ये ६ हजार ते ९ हजार रुपये भाव मिळत आहे. जांभळाची आवक पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. यामुळे दरपातळीही टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .टोमॅटो आवक कमी राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला मागणी चांगली आहे. याचा आधार टोमॅटो बाजाराला मिळत आहे. टोमॅटो पिकाला अनेक भागात पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच वाढलेल्या उन्हाचाही पिकाला फटका बसत आहे. याचा एकूण परिणाम उत्पादनावर झाला असून आवक कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात टोमॅटो सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे दरालाही आधार मिळेल, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.