Market Bulletin: सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणासोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे भाव प्रतिक्विंटल ४७०० ते ४ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान होते. खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक कायम आहे. तर हमीभावाने सोयाबीन खरेदीही वेग घेत आहे. आतापर्यंत राज्यात ९५ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी अनेक शेतकरी थांबलेले आहेत. तर पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील सोयाबीनची आवक कमी होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस दर स्थिरदेशातील बाजारात कापसाची आवक चांगली सुरु आहे. नुकतेच काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज काहीसा वाढवला. बाजारातील आवकेत चांगल्या मालाचे प्रमाणाही जास्त आहे. सीसीआयची खरेदीही वाढत आहेत. याचा बाजाराला आधार आहे. मात्र दुसरीकडे आयातही सुरु आहे. या कारणाने बाजारात कापूस ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयाने विकाला जात आहे. बाजारातील कापसाची आवक पुढील काही दिवस स्थिर राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..MSP Procurement: हमीभाव खरेदीवरून गदारोळ.कांदा दरात सुधारणाराज्यातील बाजारात कांद्याची आवक काहीशी मर्यादीत झाली आहे. खरिपातील पिकाला पावसाचा दणका बसल्याने उत्पादन कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे बांगलादेश आणि श्रीलंकेला निर्यातीचा आधार बाजाराला मिळत आहे. सध्या बाजारात कांद्याचा सरासारी भाव १५०० ते १६०० रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे. तर कमाल भाव १८०० ते २ हजारांवर पोचला आहे. पुढील काळात कांदाची आवक स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दराला आधार मिळू शकतो,असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले..Onion Procurement Payment: ‘ग्राहक व्यवहार’चा कांदा देणींबाबत आडमुठेपणा.टोमॅटो दराला आधारराज्यातील बाजारात टोमॅटोचे भाव टिकून आहेत. बाजारातील आवकही मर्यादीत दिसत आहे. सध्या राज्यातील पुणे, नारायणगाव, पिंपळगाव बसवंत, मुंबई, नागपूर जिल्ह्यात आवक काहीशी अधिक दिसत आहे मात्र सरासरीपेक्षा कमीच आहे. इतर बाजारातही कमी प्रमाणात टोमॅटो येत आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. सध्या टोमॅटोला बाजारात सरासरी २५०० ते ३ हजार रुपये दर मिळत आहे. टोमॅटोचे दर पुढील काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत..डाळिंब तेजीतचराज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. सध्या बाजारातील आवक खूपच आहे. तसेच बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला फटका बसत आहे. बाजारात येणाऱ्या मालात गुणवत्तापूर्ण मालाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सरासरी ८ हजार ते १० हजार रुपये दर मिळत आहे. डाळिंबाची सध्या मुंबई, पुणे, सांगोला, सांगली, नागपूर जिल्ह्यात आवक काहीशी अधिक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. पुढील काळातही डाळिंबाची आवक मर्यादीत राहून दर टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.