Market Bulletin:सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतारआठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारीही सोयाबीनच्या बाजारात चढ उतार दिसून आले. प्रक्रिया प्लांट्नीही सोयाबीन खरेदीचे भाव कमी केले होते. प्रक्रिया प्लांट्नी आज ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी केली. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच झालेली आहे. तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. त्यामुळे पुढील काळात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सोडले तर भाव एका पातळीच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसात नरमाईकापसाच्या भावातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापसाची बाजारातील आवक कमीच असली तरी कापसाचा उठाव कमी जास्त होत आहे. सरकारनेही कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले आहे. याचा दरावर परिणाम दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. पण देशात कापूस काहीसा नरमला होता. कापसाचा भाव आज सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यामुळे देशातही दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Banana Price Crisis: खानदेशात केळीदराचा प्रश्न कायम.कांद्यात काहीशी सुधारणाकांदा भावात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. नाफेडची खरेदीही सुरु झाली आहे. बाजारातील कांदा आवकही काही बाजारांमध्ये कमी दिसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचाच आधार दराला मिळत आहे. काही बाजारांमध्ये सरासरी भाव ८०० रुपयांच्या दरम्यान दिसत असला तरी बहुतांशी बाजारातील भाव एक हजार रुपयांच्या पुढे सरकला आहे. बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी भाव ११०० ते १३०० रुपयांच्या दरम्यान होता. बाजारातील स्थिती पाहता कांदा भावाला आधार राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Maharashtra Sugar Quota: महाराष्ट्राच्या साखर कोट्यात वाढ.लिंबू स्थिरराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लिंबाचा भाव स्थिरावला आहे. बाजारातील लिंबाची आवक कमी असूनही भाव स्थिरावलेले आहेत. वाढलेली उष्णता आणि उकाड्यामुळे लिंबाला सध्याही मागणी चांगली आहे. असे असले तरी लिंबू प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकले जात आहे. उष्णतेचा आणि वादळी पावसाचा लिंबू पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे लिंबाची आवक पुढील काही आठवडे मर्यादीतच राहू शकते, असा अंदाज लिंबू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..आल्याचे भाव टिकूनआल्याची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी स्थिरावली आहे. लग्नसराईमुळे आल्याला चांगला उठाव होता. याचाही आधार दराला मिळाला. आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात आले सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. आल्याला पुढील काळातही मागणी राहण्याची शक्यता आहे. तर आल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.