Market Bulletin: कांदा दरात घसरणराज्यातील कांदा बाजारात आवक वाढली आहे. उठाव मात्र कमी आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण झाली आहे. उन्हाळ कांद्याची साठवणूक संपली आहे. तर लाल कांद्याची काढणी सुरु झाली आहे. त्यामुळे कांद्याची बाजारातील आवक वाढली आहे. राज्यातील बाजारात शुक्रवारी ४ लाख १८ हजार ९८ क्विंटलची आवक झाली. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. शनिवारी ११ वाजेपर्यंत ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली होती. राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याची सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते १ हजार रुपयांनी विक्री झाली. आधीच अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांना झटका बसला. त्यात दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहे. पुढील काळात आवक काही प्रमाणात कमी होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत..गहू दर टिकूनकेंद्र सरकारने गुरुवारी गव्हाच्या साठ्यावरील मर्यादा काढली आहे. देशातील गहू बाजारावर सरकारचे बारीक लक्ष आहे. सध्या देशातील गव्हाच्या बाजाराला लग्नसराईचा आधार आहे. त्यामुळे गव्हाच्या बाजारात काहीशी सुधारणा दिसत आहे. राज्यातही गहू दराला मागणीचा आधार आहे.तर आवकही कमीच आहे. त्यामुळे गव्हाचे दर टिकून आहेत. राज्यातील बाजारात गव्हाला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांनी विक्री होत आहे. रब्बी हंगामातील गव्हाची काढणी पुढील काळात सुरु होईल. त्यानंतर आवकेत सुधारणा होईल, त्यामुळे पुढील काळात गहू दरात चढ-उतार राहू शकतील, असा अंदाज अभ्यासकांनी सांगितले आहे..Papaya Rate: खानदेशात पपईला १३ ते १६ रुपये दर.सोयाबीन दरात सुधारणासोयाबीनची मागणी चांगली असून बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे राज्यातील काही मोठ्या बाजारात सोयाबीन दरात शुक्रवारी ५० ते ते १५० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. राज्यातील बहुतांश बाजारात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला. तर प्रक्रिया प्लॉट्सचे खरेदी दर ५ हजार ७०० ते ६ हजारांच्या दरम्यान आहेत. खुल्या बाजारात सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन दर पुढील काळात टिकून राहतील, अशी शक्यता सोयाबीन बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत..Onion Farmer Issue: कांदा उत्पादक पुन्हा संकटात.कापूस बाजार स्थिरमागील दोन दिवसांपासून कापूस बाजारात काहीसे चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र कापूस बाजार शनिवारी काहीसा स्थिरावला आहे. यंदाच्या हंगामात कापूस उत्पादकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे उत्पादनही घटले. राज्यातील बाजारात कापसाचे दर ७ हजार ९०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या सीसीआयची कापूस विक्री सुरु आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ-उतार दिसत होते. परंतु शनिवारी मात्र कापूस दरात काहीसे दर स्थिरावले होते. सीसीआयच्या कापूस विक्रीमुळे दरात काहीसे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..पपईला उठाव टिकूनराज्यातील बाजारात पपईची आवक सध्या कमीच आहे.पपईला सध्या उठाव चांगला आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असून पपईला मागणी वाढत आहे. पपईची अनेक बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील केवळ मुंबई, पुणे, अमरावती बाजारात अधिक आवक आहे. इतर बाजारांमध्ये आवक २०० क्विंटलच्या आतच होत आहे. त्यामुळे पपई प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. पपईची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहून दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.